breaking-newsराष्ट्रिय

इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे बलात्काराचे प्रमाण वाढले: भाजपा खासदार

देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असून यासाठी स्मार्टफोन आणि इंटरनेट कारणीभूत असल्याचा दावा भाजपा खासदार नंदकुमार चौहान यांनी केला आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळे तरुणांना सहज अश्लिल व्हिडिओ बघायला मिळतात आणि याचा प्रभाव त्यांच्या मनावर पडतो, असे त्यांनी म्हटले आहे.

मध्यप्रदेशमधील मंदसौर येथे ७ वर्षांच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे, यावर तुमचे मत काय, असा प्रश्न बुरहानपूरचे खासदार नंदकुमार चौहान यांना पत्रकारांनी विचारला. यावर चौहान म्हणाले, यासाठी स्मार्टफोन आणि इंटरनेट कारणीभूत आहे. यामुळे तरुणांना सहज अश्लिल व्हिडिओ बघणे शक्य झाले आहे. याचा प्रभाव त्यांच्यावर पडतो. इंटरनेटमुळे लोकांमध्ये मानसिक विकृती येत असून यातूनच बलात्काराचे प्रमाण वाढत आहे, असा दावा त्यांनी केला.

View image on Twitter

ANI

@ANI

I think youngsters these days have easy access to internet & smartphones,they watch obscene content on it, this has a negative impact on their innocent minds. All these facts have been reported in media as well: Nand Kumar Chauhan,BJP MP on cases of crime against women

या पत्रकार परिषदेत त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या कामाचे भरभरुन कौतुक केले. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा नसून चौहान यांना आव्हान देऊ शकेल असा नेताच त्यांच्याकडे नाही, असे त्यांनी सांगितले. भाजपा संविधानानुसार चालणारा पक्ष असल्याचेही त्यांनी नमूद केले. ज्या भाजपा आमदारांची कामगिरी सुमार आहे किंवा जे पुन्हा निवडून येण्याची शक्यता नाही, अशा विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाऊ शकतात, असे संकेत त्यांनी दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button