breaking-newsमहाराष्ट्र

इंजेक्‍टेशबल पोलिओ लसींचा तुटवडा?

  •  खासगी डॉक्‍टरांकडे लस उपलब्ध नसल्याचा दावा

पुणे – देशात पोलिओचे संपूर्ण निमूर्लन झाले असे सांगण्यात आले असले, तरीही येण्याऱ्या पिढीला पोलिओ होऊ नये यासाठी पोलिओ प्रतिबंधक लस देण्यात येते. मात्र, खासगी रुग्णालयांत इंजेक्‍टेबल पोलिओ लसीचा तुटवडा असल्याचे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे.

खासगीमध्ये लस उपलब्ध आहे की नाही, याची नोंद महापालिका आरोग्य विभाग ठेवत नाही. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पोलिओची लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
अंजली साबणे, सहायक आरोग्य अधिकारी, मनपा.

पोलिओ या आजाराविषयी देशात मोठ्या प्रमाणात जागृती करण्यात आली आहे. त्यामुळेच आता याचे रुग्ण सध्या आढळत नाही. मात्र, तरीही खबदारीच्या दृष्टीकोनातून लहान मुलांना पोलिओ होऊ नये म्हणून 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना ही प्रतिबंधक लस देण्यात येते. पुणे शहरातही ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली असून घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात आले आहे. पण, अनेकदा उच्चभ्रू कुटुंबबातील मंडळी अशा प्रकारे पालिकेच्या रुग्णालयांत ही लस घेत नाहीत. तसेच घरपोच आलेल्या मोहिमेतही सहभागी होत नाहीत. अशांना खासगी रुग्णालयातच जाणे योग्य वाटते. तोंडावाटे दिली जाणारी पोलिओची लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, इंजेक्‍शनवाटे दिली जाणारी लस ही उपलब्ध नसल्याचे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे.

याबाबत बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद जोग म्हणाले, इंजेक्‍शनवाटे दिली जाणारी पोलिओ प्रतिबंधक लस ही तोंडी लसीच्या पाचपट प्रभावी असते. तोंडावाटे दिली जाणारी लस ही आतड्यांमध्ये जाऊन प्रतिबंध करते तर सुईच्या माध्यमातून दिलेली लस शरिरात सर्वत्र परिणाम करते. त्यामुळे आम्ही बऱ्याचदा इंजेक्‍शनची लस सुचवितो. मात्र, सध्या ती खासगी मेडिकल्समध्ये उपलब्ध होत नाही. शासनाने ही उपलब्ध करुन द्यावी. तसेच तोंडावाटे दिली जाणारी लसही सुरू ठेवावी. पालकांना योग्य वाटेल, तो पर्याय ते स्वीकारतील.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button