breaking-newsराष्ट्रिय

इंजिनिअरपासून मॅनेजमेंट पदवीधारकांपर्यंत दहा हजार जणांनी घेतली नागा साधू होण्याची दीक्षा

प्रयागराज येथे सुरू असलेला कुंभमेळा सध्या अखेरच्या टप्प्यात आहे. भारतातील या सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यामध्ये इंजिनिअरपासून मॅनेजमेंट पदवीधारकांपर्यंत दहा हजार तरूण-तरूणींनी नागा साधू होण्याची दीक्षा घेतली आहे. मरीन इंजीनिअरिंग केलला २७ वर्षीय रजत कुमारने समुद्री तटावर मिळाणारे मोठं पॅकेज स्विकारण्याऐवजी नागा साधू होण्याची दीक्षा घेतली आहे. सनातन धर्मांमध्ये नागा साधू बनणे तपस्यातील सर्वात कठीण विधपैकी एक आहे. रजतप्रमाणेच २९ वर्षीय शंभू गिरी नागा साधूची दिक्षा घेण्याच्या वाटेवर निघाला आहे. त्याने युक्रेनमधून मॅनेजमेंटमधून पदवी घेतली आहे. उज्जैनमधील बारावीचा टॉपर असलेल्या घनश्याम गिरीचीही ही कथा आहे. या सर्वांनी मोह-माया टाळून नागा साधू होण्याची दीक्षा घेतली आहे.

रजत, शंभू आणि घनश्यामप्रमाणे दहा हजार सुशिक्षीत तरूणांनी प्रयागराज कुंभमेळ्यात सामूहिक दीक्षा समारंभात नागा साधू होण्याची दीक्षा घेतली आहे. दीक्षा घेण्याच्या परंपरेप्रमाणे त्यांनी आपले केस अर्पण केले. त्यांनी केवळ एक शेंडी(डोक्यावर केसांचा गुच्छ) ठेवली. महाकुंभच्या दरम्यान त्यांनी स्वत:चे आणि परिवाराचे पिंडदान केले. त्यानंतर रात्रभर ओम नम: शिवाय या मंत्राचा जाप करावा लागतो. त्यानंतर त्यांना नागा साधू म्हणून मान्यता मिळाली. इंजिनिअरपासून मॅनेजमेंट पदवीधारकांपर्यंत तब्बल दहा हजार सुशिक्षीतांनी नागा साधू होण्याची दीक्षा घेतली आहे.

– नागा साधू बनण्यासाठी लागतो सहा वर्षांचा कालावधी

नागा साधू बनण्यासाठी कठीण परिश्रम करावे लागतात. तसेच यासाठी तब्बल सहा वर्षानंतर नागा साधू बनता येते. तर नवीन सदस्याला फक्त लंगोटशिवाय कोणतेही वस्र परिधान करण्यास मनाई आहे. कुंभ मेळ्यात अंतिम शपथ घेतल्यानंतर नागा साधूमधील नवे सदस्य त्यांच्या लंगोटचे त्याग करु शकतात

– या नियमांचे पालन करावे लागते
नागा साधूंना त्यांच्या आयुष्यात खूप नियमांचे पालन करावे लागते. नागा साधू फक्त दिवसातून एकवेळ जेवण करु शकतात. त्याचप्रमाणे सात घरे फिरुन भिक्षा मागावी लागते. जर भिक्षा न मिळाल्यास त्यांना उपाशी राहावे लागते. फक्त जमिनीवर झोपून नागा साधूंना त्यांचे संपूर्ण आयुष्य पार पाडायचे असते.

आजचे मौनी आमावास्येनिमित्त होणारे दुसरे शाही स्नान तेरा आखाड्यांत केले जाणार आहे. हे आखाडे तीन वर्गांमध्ये विभागले आहेत. यामध्ये सन्यासी, बैरागी आणि उदासीन असे तीन आखाडे आहेत. सर्वात आधी सन्यासी आखाड्याचे साधू शाही स्नान करतील त्यानंतर बैरागी आणि शेवटी उदासीन आखाड्याचे साधू येथे शाही स्नान करतात. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मौनी आमावास्येनिमित्त पवित्र दिनी स्थानिक नागरिकांना तसेच शाही स्नानासाठी आलेल्या देश-विदेशातील भाविकांना आणि संत-महात्म्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आजवर या कुंभमेळ्यामध्ये साडेसात कोटी भाविकांनी पवित्र स्नान केल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button