breaking-newsआंतरराष्टीयक्रिडा

इंग्लंड कसोटी संघात अदिल रशीदला पाचारण

लंडन: भारताविरुद्ध आगामी कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या कसोटी संघात लेगस्पिनर अदिल रशीदचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ऍशेस मालिकेतील निराशाजनक कामगिरीमुळे संघातील स्थान गमावलेल्या मोईन अलीलाही पुन्हा पाचारण करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे इसेक्‍स संघाचा वेगवान गोलंदाज जेमी पोर्टर याला पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या 13 खेळाडूंच्या संघाचे नेतृत्व जो रूटकडे सोपविण्यात आले आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यांत आपण केवळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटला प्राधान्य देणार असल्याचे अदिल रशीदने जाहीर केले होते. तरीही त्याची कसोटी संघात निवड झाली आहे. परंतु आपण लाल चेंडूने बरेच दिवस खेळलेलो नाही. त्यामुळे हा निर्णय घेताना आपल्याला खूपच जड गेले, असे रशीदने म्हटले आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धारदार लेगब्रेकवर विराट कोहली त्रिफळा उडविल्याचे बक्षीस रशीदला मिळाल्याचे मानले जात आहे.

पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड संघ- जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, ऍलिस्टर कूक, सॅम करन, कीटन जेनिंग्ज, डेव्हिड मेलन, जेमी पोर्टर, अदिल रशीद व बेन स्टोक्‍स.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button