breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आषाढी पालखी सोहळ्यात भाविकांच्या सुरक्षेसाठी देहूरोड पोलिसांनी घेतला आढावा

देहूरोड – संत तुकाराम महाराज आषाढी पालखी सोहळ्यात भाविक वारकऱ्यांची सुरक्षिततेच्या पार्श्‍वभूमीवर देहुगाव येथील संत तुकाराम महाराज संस्थानच्या मुख्य मंदिर कार्यालयात देहुरोड उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव माडगूळकर यांच्या अध्यक्षखाली शुक्रवारी (दि. 22) आढावा घेण्यात आला.

पालखी सोहळा प्रस्थान दिवशी 5 जुलै रोजी वाहन थांबे तात्पुरते गावाच्या बाहेर विठ्ठलवाडी व माळवाडी येथे असणार आहेत. पालखी सोहळा मार्गस्थ दिवशी म्हणजे 6 जुलै रोजी वाहनांची वाहतूक तळवडेमार्गे वळविण्यात येईल. देहूत येणाऱ्या देहूरोड, चाकण-तळेगाव मार्गावरील देहूफाटा, आळंदी मार्गावरील तळवडे येथून गावात येणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल.

पोलिसांनी पालखी सोहळ्या दरम्यान देहूत येणारी वाहतूक थांबवावी मात्र पालखी बरोबरची वाहने गावात येऊ द्यावी, अशी विनंती संस्थानच्या वतीने करण्यात आली असता संस्थांनी पालखी सोहळ्यातील वाहनांना पास देण्याचे तसेच संस्थानने स्वयंसेवक, सुरक्षारक्षक नेमण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. तसेच पालखी प्रस्थान दिनी मुख्य मंदिराच्या सभामंडपात गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे सांगण्यात आले.

पालखी सोहळ्यादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येईल. यामध्ये साध्या वेशातील पोलीस पथक, बॉम्ब शोध पथक तैनात असणार आहेत. सोहळा मार्गस्थ वेळी पहिली समाज आरती ठिकाण अनगड शहावली बाबा दर्ग्याजवळ अभंग आरती वेळी भाविकांसह ग्रामस्थांची मोठी गर्दी होत असते. त्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येईल. भाविकांनी नदीपात्रात जाऊ नये यासाठी जीवरक्षकही तैनात करण्यात येतील. मंदिर परिसर तसेच घाट परिसर, सोहळ्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात येईल, असे यावेळी उपविभागीय अधिकारी माडगूळकर यांनी सांगितले.

या बैठकीला देहुरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार, पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर, गोपनीय विभागातील पोलीस अशोक नवले, संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब उर्फ पंढरीनाथ मोरे, पालखी सोहळा प्रमुख सुनील दामोदर मोरे, विश्‍वस्त अभिजित मोरे, सुनील मोरे, पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुरकर, सरपंच उषा चव्हाण, सदस्या रत्नमाला करंडे, हेमा मोरे, कोतवाल संभाजी मुसुडगे, उमेश मोरे आदी उपस्थित होते.

दरम्यान, या पालखी सोहळ्यात एक उपविभागीय पोलीस अधिकारी, सात पोलीस निरीक्षक, 18 सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक अधिकारी, 125 पोलीस कर्मचारी, 75 महिला पोलीस कर्मचारी, 70 वाहतूक नियंत्रक पोलीस, 100 पुरुष होमगार्ड, 50 महिला होमगार्ड, पोलीस मित्र.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button