breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

आषाढीवारी सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाची जय्यत सज्ज

प्रभारी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांची माहिती 
पिंपरी –  आषाढी वारीनिमित्त जगदगुरु संत तुकाराम महाराज आणि  संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारक-यांसाठी मुलभूत सोयी-सुविधा पुरविण्यास महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे.  महापालिकेकडून आरोग्य, वैद्यकीय, अग्नीशामक अत्यावश्यक सेवेसह विविध सेवा देण्याची तयारी केली आहे. तसेच सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, नियंत्रण कक्ष, विसावा स्थळ, पिण्याचे पाणी, मोबाईल टाॅयलेट यासह अन्य सुविधा महापालिकेने उपलब्ध केल्या आहेत.

याबाबत महापालिका प्रभारी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे म्हणाले की, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे निगडीतील भक्ती-शक्ती येथे शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी, तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे शनिवारी (दि.७) दिघी मॅग्झिन येथे आगमन होणार आहे. त्या निमित्ताने महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरात वारक-यांच्या सोयीसाठी तयारी सुरू आहे. पालखी सोहळ्यातील दोन्ही ठिकाणी महापालिकेकडून नियंत्रण कक्ष तयार करण्यात येत आहे. संत तुकारामनगर, दापोडी येथील विसावा स्थळी सर्व सेवा सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. भक्ती-शक्ती ते दापोडी व आळंदी ते दिघी मार्गावरील सर्व खड्डे बुजविण्यात आले आहेत.

आकुर्डीत मुक्काच्या ठिकाणी  दर्शनासाठी दर्शबारी व गर्दी नियंत्रणासाठी बॅरेकेट्स लावण्यात आले आहेत. महापालिकेच्या व खाजगी ३६ शाळांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी पालिकेच्या ८० कर्मचा-यांची पथकांची नेमणूक करण्यात आली. नियंत्रण कक्ष, मुक्कामाच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. मुक्काम व विसाव्याच्या ठिकाणी साफसफाई, जंतुनाशक फवारणी, फिरते शौचालय या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. तर सुरक्षेसाठी महापालिका सुरक्षा रक्षकांची नियुक्तीही करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचे एकूण ५५० स्वच्छतागृहे आहेत. या व्यतिरिक्त आकुर्डी मुक्काच्या  ठिकाणी व पालखी मार्गावर ३९० पोर्टेबल टॉयलेट भाडेतत्त्वावर घेण्यात आले आहेत. त्यामुळे तब्बल ९४० स्वच्छतागृहाची व्यवस्था पालिकेने केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button