breaking-newsक्रिडा

आशियाई खेळ : यंदा बाॅक्सिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकूनच येणार

  • भारतीय बाॅक्सर मनोज कुमारने केला वादा

नवी दिल्ली – इंडोनेशियामध्ये होणाऱ्या आशियाई खेळाच्या बाॅक्सिंग स्पर्धेत भारतीय बाॅक्सिंग दलाकडून खूप साऱ्या आशा व्यक्त केल्या जात आहेत. क्रीडारसिकांना आशा आहे की, यावेळेस भारतीय बाॅक्सर चांगली कामगिरी करून जास्तीत जास्त पद जिंकून येतील. यामध्ये भारताचा अनुभवी बाॅक्सर मनोज कुमार हा सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

वर्ष २०१० च्या राष्ट्रमंडल स्पर्धेत सुवर्ण आणि २०१८ च्या राष्ट्रमंडल स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या मनोज ने म्हटले आहे की, ‘मी यंदाच्या आशियाई खेळात बाॅक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकूनच येईल’. एका मुलाखतीदरम्यान मनोज म्हटला की, ‘मला पूर्ण विश्वास आहे की, यावेळेस मी सुवर्णपदक जिंकूनच येईल, आणि यासाठी मी पूर्णपणे सकारात्मक आहे. सकारात्मक विचारासोबत मी प्रशिक्षणही व्यवस्थित करत आहे’.

मनोज कुमार हा ६९ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करेल. दहा सदस्यांच्या बाॅक्सिंग संघातील तो एकमेव खेळाडू आहे की, त्याने ‘अाशियाई  एमेच्योर बाॅक्सिंग चॅम्पयिनशिपमध्ये’ दोन पदके जिंकली आहेत. आशियाई खेळात बाॅक्सिंगच्या स्पर्धा २४ आॅगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान होतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button