breaking-newsमनोरंजन

‘आरारारा खतरनाक’; ‘मुळशी पॅटर्न’च्या गाण्याने ओलांडला २५ दशलक्ष व्ह्यूजचा टप्पा

प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित, अभिनित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. या चित्रपटाला विविध पुरस्कार सोहळ्यातही सन्मानित करण्यात आले. या चित्रपटातील अबालवृद्धांनी डोक्यावर घेतलेल्या ‘अराररारा खतरनाकऽऽ‘ या गाण्याने आपली घौडदौड कायम राखत नुकताच २५ दशलक्ष व्हूजचा टप्पा पार केला. तसेच काही दिवसांपूर्वी झी टॉकीजवर या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झाला त्यातही ‘मुळशी पॅटर्न’ने टीआरपीचा उच्चांक गाठला आहे.

आयटम सॉंगच्याच धर्तीवर बनलेल्या भाईटम सॉंगची खासियत म्हणजे यात शहरातील सगळ्यात मोठ्या भाईचा वाढदिवस असतो आणि त्या दिवशीच्या जल्लोषावर आधारलेले हे गाणे आहे, त्यामुळे या गाण्यास खास भाई स्टाईल डान्स बघायला मिळतो. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले असून नरेंद्र भिडे यांनी गाण्याला संगीत दिले आहे तर आदर्श शिंदे यांनी अफलातून गायले आहे. गीतकार प्रणीत कुलकर्णी यांनी ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे गीत लिहिले आहे.

या गाण्याने सोशल मिडीया, संगीत वाहिन्या आणि विविध म्युझिक अॅप्सवर ट्रेंड करत गाण्याने सर्वत्र धुमाकूळ घातला. आजही अनेक वाढदिवसाच्या पार्टीत हे गाणे हमखास लावतात तसेच विविध डान्स स्पर्धामध्ये लहान मुले यावर थिरकताना दिसतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button