breaking-newsपुणेमहाराष्ट्र

आरती मिसाळ टोळीवर “मोक्‍का’अंतर्गत चार्जशिट

 

  • ड्रग्जतस्करीचे रॅकेट : जानेवारीत झाली होती अटक, अन्य दोघी फरार

पुणे – अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीची प्रमुख आरती मिसाळ उर्फ आरती मुकेश चव्हाण उर्फ आरती विशाल सातपुते व तिच्या साथीदारांविरुद्ध मोक्कानुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे व त्यांच्या पथकाने गोपीनाथ नवनाथ मिसाळ (22, रा. लोहियानगर ) हुसेन पापा शेख (28, रा. मुंबई), आरती महादेव मिसाळ (27, रा. लोहियानगर), पूजा महादेव मिसाळ (32, लोहियानगर), निलोफर हयात शेख (27, रा. हरकानगर), अजहर उर्फ चुहा हयात शेख (24, हरकानगर), रॉकिसिंग जालिंदरसिंग कल्याणी ( 23,रा.रामटेकडी, हडपसर) यांना 7 जानेवारी 2018 रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे तपास करुन 100 ग्रॅम ब्राऊन शुगर व दोन किलो 50 ग्रॅम चरस अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, कार, एक ऍक्‍टिव्हा, एक मोबाइल असा 12 लाख 30 हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे. आयेशा उर्फ आशाबाई पापा शेख व जुलैखाबी पापा शेख उर्फ जुलैखाबी महमद कुरेशी उर्फ जिल्लो या दोघींकडून आरोपी अंमली पदार्थ खरेदी करत होते. या दोघीही सध्या फरार आहेत.

अपर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के, उपनिरीक्षक संजय गायकवाड, आनंत व्यवहारे, व पोलीस कर्मचारी अनिकेत बाबर, राहूल जोशी, महेश बारवकर, महेश कांबळे यांनी कारवाई केली आहे. या गुन्हयाचा तपास सहायक पोलीस आयुक्त किशोर नाईक करत आहेत.

अबब…संपत्तीचा डोंगर
टोळी प्रमुख आरती मिसाळ इतर आरोपींच्या मदतीने संघटीतरित्या अंमली पदार्थांची विक्री करत होती. तिने या व्यवसायातून मिळवलेल्या उत्पन्नामधून 40 लाख रुपये किंमतीची मालमत्ता, दोन ठिकाणी घरे खरेदी केली आहेत व वाघोली येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये सदनिका खरेदीबाबत व्यवहार केला आहे. तसेच तिने अंदाजे 60 लाख रुपये किंमतीचे दागिने खरेदी केल्याबाबत व बॅंकेत लॉकर असल्याबाबत माहिती मिळाली आहे. त्यासंदर्भात तपासही सुरू आहे.

टोळीतील इतर सदस्यही मालामाल
आरती मिसाळ हिने आर्थिक प्राप्तीसाठी टोळी तयार करुन संघटीतरीत्या गुन्हा केल्याचे आढळुन आले आहे. तिच्याविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त (दक्षिण) रविंद्र सेनगावकर यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यांनी मोक्काप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश दिले होते. आरती मिसाळ हिने संघटीरित्या तसेच एकट्याने शहरातील लोहीयानगर, हरकानगर, कासेवाडी, वानवडी, रामटेकडी परिसरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विक्री करुन आर्थिक नफा मिळवला आहे. यातुन टोळीतील सदस्यांनी जंगम व स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे आढळले आहे.

  • वय अवघे 27, कारनामे मात्र सराईतराचे
    आरती मिसाळविरुद्ध खडक, पिंपरी पोलीस स्टेशन येथे ब्राऊन शुगर व दारू विक्रीचे चार गुन्हे दाखल आहेत. तर पूजा मिसाळविरुद्ध पिंपरी पोलीस स्टेशन येथे ब्राऊन शुगर विक्रीचा एक गुन्हा दाखल आहे. तर अजहर चुहा शेख याच्यावर खडक पोलीस ठाण्यात घरफोडी व मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला एक वर्षासाठी तडीपारही करण्यात आले होते. तर निलोफर शेख ही सदर व्यवसायातून मिळालेले पैसे बेकायदा खाजगी सावकरी व्यवसायात गुंतवत होती. यासंदर्भात तिच्याविरुध्द खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button