breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘आरटीई’ प्रवेशाची आजपासून प्रक्रिया

मुंबई – मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार (आरटीई) होणाऱ्या प्रवेशाचे अर्ज भरण्यास मंगळवार (ता. ५) पासून सुरुवात होत आहे.

वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. आरटीईची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन असल्याने पालकांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागते. अत्यावश्‍यक कागदपत्रे, ऑनलाईन नोंदणी कशी करावी, शाळांची योग्य निवड कशी करावी आदींबाबत पालकांना पुरेशी माहिती नसल्याने अनेक होतकरू मुले प्रवेशाला मुकतात.  गेल्या वर्षी आरटीईच्या सुमारे ८ हजार ५०० जागा रिक्त राहिल्या होत्या. हीच बाब लक्षात घेत सर्वत्र ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन केले जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button