breaking-newsपुणेमहाराष्ट्र
आरटीईची तिसरी लॉटरी सोमवारी
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत दिल्या जाणाऱ्या राखीव जागांवरील प्रवेशाची तिसरी लॉटरी सोमवारी 2 जुलै रोजी काढणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी हारुन आत्तार यांनी दिली. आत्तार म्हणाले, काही किरकोळ ठिकाणाच्या शाळेतील प्रवेश होणे अद्याप बाकी आहेत ते झाले की प्रवेश दुसऱ्या फेरीतील प्रवेश पूर्ण होतील. त्यानंतर सोमवारी तिसरी लॉटरी काढली जाईल. आरटीईअंतर्गत पुणे तसेच पिंपरी चिंचवडमधील काही शाळांच्या तक्रारी आल्या होत्या, त्यानुसार त्या त्या विभागाकडे पाठवत त्या सोडविण्यात येत आहेत असेही आत्तार यांनी सांगितले.