breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयुक्तांशी विरोधी पक्षनेत्यांची शाब्दिक बाचाबाची

स्मार्ट सिटी सल्लागार समितीच्या बैठकीत दोन्ही आमदारासमोर वाद

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  महापालिकेच्या स्मार्ट सिटी सल्लागार समितीच्या बैठकीत शुक्रवारी (दि.३१) महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी सल्ला घेण्यासाठी बोलाविल्या या बैठकीत हे वादंग झाले. त्यामुळे नाराजी व्यक्त करत दत्ता साने यांनी आयुक्तांचा निषेध करून बैठकीवर बहिष्कार घातला.

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गंत शहरात एरिया बेस डेव्हलपमेंट व पॅनसिटी हे दोन प्रकल्प राबविले जात आहे. या संपुर्ण प्रकल्पाची माहिती स्मार्ट सिटी सल्लागार समितीला देण्यासाठी आयुक्त दालनात बैठक बोलाविण्यात आली. बैठकीत उपस्थितांना स्मार्ट सिटी योजना व त्यातून शहरात शहरात राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांची माहिती देण्यात आली.  सादरीकरणामध्ये त्यामध्ये विरोधी पक्षनेते साने यांनी स्मार्ट सिटीमधून कासारवडी मैलाशुध्दीकरण केंद्र व निगडीतील जलशुध्दीकरण केंद्रात सौरऊर्जा, तर मोशी कचरा डेपोत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविण्यात येत आहे. वेस्ट टू एनर्जीतील वीज ५ रुपये दराने, तर स्मार्ट सिटीतील प्रकल्पाची वीज साडेतीन रुपये दराने पालिका खरेदी क रत आहे. दरातील या फरकाबाबत साने यांनी शंका उपस्थित केल्याने त्याला आयुक्त हर्डीकर यांनी प्रत्युत्तर दिले.

त्यावरून हे दोघे भिडले. त्यानंतर आयुक्तांनी अज्ञानपुरक वक्तव्य  करत असल्याचे म्हटल्याने साने चिडले. तुम्ही नोकर असताना आमच्या सूचनांवर चिडता कशाला, असा प्रश्न त्यांनी केला. साने निषेध करून बैठकीवर बहिष्कार घालून आयुक्त दालनातून बाहेर पडले. सादरीकरणानंतर उपस्थित पदाधिकारी, विविध क्षेत्रातील सल्लागार समितीच्या सदस्यांच्या सूचना घेण्यात आल्या. त्यात स्मार्ट सिटीत झोपडपट्टी भाग, समाविष्ट गावांचा समावेश करा, सीएसआर निधीचा वापरावा, स्मार्ट रुग्णालय, पार्कीग स्पेसेस, सायकल ट्रक, खासगी लोकांचा सहभाग घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. या बैठकीला खासदार अमर साबळे, श्रीरंग बारणे, महापौर राहूल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button