breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयुक्तांची कृपादृष्टी, 16 अधिकारी-कर्मचा-यांचे सेवानिलंबन रद्द

  • फाैजदारी गुन्ह्यातील अधिकारी-कर्मचा-यांना घेतले महापालिका सेवेत
  • महापालिका निलंबन आढावा समितीची शिफारस

पिंपरी ( महा ई न्यूज ) – लाचलुचपत प्रतिबंधक कारवाई झालेले, फाैजदारी स्वरुपाच्या गुन्ह्यात अटक केलेले आणि गंभीर स्वरुपाच्या महिलाच्या तक्रारी केलेल्या अधिकारी व कर्मचा-यांवर आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी कृपादृष्टी दाखविली आहे. महापालिकेच्या निलंबन आढावा समिती शिफारसीनूसार सेवानिलंबित 16 अधिकारी व कर्मचा-यांना पुन्हा महापालिकेच्या सेवेत रुज्जू करुन घेतले आहे. याबाबत आदेश आज (सोमवारी) आयुक्तांनी काढला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध 16 अधिकारी व कर्मचा-यांना सेवानिलंबित करुन त्यांची खातेनिहाय चाैकशी करण्यात येत होती. सदरील कर्मचा-यांना घरी बसून 75 टक्के वेतन दिले जात होते. हे कर्मचारी तब्बल एका वर्षापासून महापालिका सेवेत कार्यरत नव्हते. त्यामुळे सदरील कर्मचारी व अधिका-यांना घरी बसून वेतन देणे, हे महापालिकेला अशक्य होते. त्यामुळे महापालिकेच्या निलंबन आढावा समिती झालेल्या बैठकीत त्या कर्मचा-यांना आर्थिक स्वरुपाचे कामकाज न देता, जनसंपर्क येणार नाही, अशा स्वरुपाचे कामकाज  देण्यासंर्दभात निर्णय घेण्यात आला. तसेच त्यांची खातेनिहाय चाैकशी यापुढे देखील सुरुच राहणार आहे. त्यामुळे सदरील 16 कर्मचारी व अधिका-यांना पुन्हा महापालिका सेवेत रुज्जू करुन घेण्यात आले आहे.

दरम्यान, सदरील त्या अधिकारी व कर्मचा-यांचे न्यायालयीन निर्णय प्राप्त होणेसाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखाबरोबर अपचारी कर्मचा-याची राहणार आहे. न्यायालयाचे निर्णय प्राप्त होताच तात्काळ प्रशासन विभागास सादर करावेत, याशिवाय अपचारी अधिकारी व कर्मचा-याची नेमणूक अकार्यकारी पदावर करणेत येणार आहे. असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

सेवानिलंबन रद्द केलेले कर्मचारी आणि त्याचा पदस्थापनेचा विभाग

अलका कांबळे ( माध्यमिक शिक्षण), बाबासाहेब राठोड (माध्यमिक शिक्षण), राजेंद्र शिर्के (वायसीएम), तानाजी दाते (आरोग्य ), किशोर शिंगे (मुख्य लेखा परिक्षण), प्रकाश रोहकले (झोनिपू), अमोल वाघेरे (पशुवैद्यकीय), उदय वानखेडे आणि अनिल माने (अग्निशामक), रविंद्र कांबळे ( क्रिडा विभाग, राजेश रजपूत ( उद्यान) सुभाष खरात (भूमी व जिंदगी), निलेश आनंद राठोठ (उद्यान), शितल चतुर्वेदी ( अ क्षेत्रीय), शैलेश जाधव (तालेरा रुग्णालय), सचिन घनवट (सांगवी रुग्णालय)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button