breaking-newsआंतरराष्टीय

आयातशुल्क प्रकरणी चीनचे अमेरिकेला प्रत्युत्तर

बिजींग – अमेरिकेने ‘मेड इन चायना’ उत्पादनांवर आयात शुल्क मागे घेतलं नाही तर चीन 5,200 अमेरिकन उत्पादनांवर मोठा कर लागू करेल, असा धमकीवजा इशारा चीनने दिला आहे. आधी जाहीर केलेल्या नव्या कर नियमांशिवाय आणखी 200 अब्ज डॉलर मूल्याच्या चिनी उत्पादनांवर अतिरिक्त कर लादणार असल्याचं अमेरिकेने जाहीर केल्यानंतर चीनच्या राज्य परिषदेने ही भूमिका घेतली आहे.

अमेरिका स्वतःहूनच दोन्ही महासत्तांमधला तणाव वाढवत असल्याचं चीनने म्हटलं आहे. त्यामुळे आम्ही आता जवळजवळ 60 अब्ज डॉलर किमतीच्या अमेरिकन उत्पादनांवर 5 ते 25 टक्के अतिरिक्त कर लावणार आहोत, असंही चीनने सांगितले.

अमेरिकेनुसार चीनच्या अन्याय्य व्यापार धोरणांमुळेच त्यांच्यावर हा कर भार लादण्यात येत आहे. चीनमध्ये काही क्षेत्रांमध्ये परदेशी कंपन्यांना चिनी कंपन्यांबरोबर भागीदारी केल्यावरच व्यवसाय करण्याची परवानगी मिळते.
त्यामुळे अमेरिकेच्या कंपन्यांना त्याचा फटका बसतो, असा आरोप राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केला आहे. चीनचं व्यापारी धोरण हे अमेरिकेच्या हिताचं नाही. त्यामुळे व्यापारी तुट निर्माण होते, असे ते म्हणतात. त्यामुळे पलटवार करण्याऐवजी चीनने आपलं व्यापार धोरण बदलावं, असं व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव सॅरा सॅंडर्स म्हणाल्या.

ट्रप यांनी चीनहून आयात होणाऱ्या स्टील उत्पादनांवर 25 टक्के तर ऍल्युमिनियम उत्पादनांवर 10 टक्के आयात कर लावला होता. ट्रंप यांच्या निर्णयावर अमेरिका, युरोप, कॅनडा आणि मॅक्‍सिकोसह अनेक देशांनी टीका केली होती.
याची सुरुवात झाली तेव्हा झाली जेव्हा अमेरिकेने 50 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर आयात कर लादणार असल्याचं मार्चमध्ये जाहीर केलं. यापैकी 34 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवरील 25 टक्के कर 6 जुलैपासून लादण्यात आला. चीनने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button