breaking-newsपिंपरी / चिंचवड

आयटी अभियंत्याचा सहा वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी ( महा ई न्यूज ) – आयटी कंपनीत अभियंता म्हणून काम करणाऱ्या इसमाने सहा वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला. ही संतापजनक घटना शनिवारी (दि. 1) थेरगाव येथे घडली. नराधम अभियंत्याला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

चेतन कृष्णराव कामले (वय 30, रा. थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन व पिडीत मुलगी एकाच वसाहतीत राहत होते. शनिवारी पीडित मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत सोसायटीच्या प्रांगणात खेळत होती. त्यावेळी चेतन याने तिला जिन्याखाली बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही बाब घाबरलेल्या मुलीने आईला सांगितली. त्यावरून पालकांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button