breaking-news

आयकर विभाग, हॉकी लव्हर्स, पीसीएमसी संघांचा उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश

  • सातवी कै. हुसेन नाबी शेख मेमोरियल हॉकी अजिंक्‍यपद स्पर्धा

पुणे: आयकर विभाग संघ, हॉकी लव्हर्स आणि पीसीएमसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा वेगवेगळ्या शैलीत पराभव करताना सातव्या कै. हुसेन मेमोरियल हॉकी स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. कै. हुसेन नाबी शेख हॉकी आणि स्पोर्टस्‌ फाऊंडेशन यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर पिंपरी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या फ गटातील लढतीत हॉकी लव्हर्स संघाने पुणे सिटी पोलिस संघाचा 4-0 असा सहज पराभव करून आगेकूच केली. यामध्ये जगदीश कस्तुरे याने दोन गोल नोंदवीत विजयात मोलाचा वाटा उचलला. तर अयूब पी. आणि कमलाकर गायकवाड यांनी प्रत्येकी एक गोल करताना त्याला सुरेख साथ दिली. पुणे सिटी पोलीस संघाला एकाही गोलची नोंद करता आली नाही.
आज झालेल्या ब गटातील साखळी सामन्यात आयकर विभाग, पुणे संघाने प्रियदर्शनी संघाचा 9-0 असा दणदणीत पराभव केला. आयकर संघाकडून नितीन कुमार व विक्रम सिंग यांनी प्रत्येकी दोन गोल करताना संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. हरजीतत सिंग, आशिष चेट्टी, सूरज शाही, आशुतोष लिंगेश आणि शैलेश कस्तुरे यांनी प्रत्येकी एक गोल करताना त्यांना सुरेख साथ दिली.

त्यानंतर ह गटातील सामन्यात किड्‌स इलेव्हन संघाने खडकी एज्युकेशन सोसायटी संघाचा 10-1 असा धुव्वा उडवीत आगेकूच केली. किड्‌स इलेव्हनकडून रियाझ कुरेशी, शहाबाज खान, रिहवान खान व मोहम्मद शारीक यांनी प्रत्येकी दोन गोल नोंदविताना विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. तसेच अभिमानदास ठाकूर व आरिफ कुरेशी यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवीत त्यांना साथ दिली. पराभूत संघाकडून हितेश कल्यानाने एकमेव गोल केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button