breaking-newsराष्ट्रिय

आयएनएक्‍स मिडीया प्रकरणी चिदंबरम यांना 3 जूनपर्यंत दिलासा

नवी दिल्ली – “आयएनएक्‍स मिडीया’ प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने 3 जूनपर्यंतचा दिलासा दिला आहे. चिदंबरम यांना 3 जूनपर्यंत अटक करण्यात येऊ नये, असे निर्देश न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. चिदंबरम यांनी अटकपूर्व जामिनासाठीही अर्ज केला आहे. या अर्जावर सीबीआयने आपले म्हणणे 3 जूनपर्यंत मांडावे, असेही न्यायालयाने सांगितले आहे.

सीबीआयच्यावतीने बाजू मांडणारे अतिरिक्‍त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध केला. चिदंबरम यांना सीबीआयने केवळ चौकशीसाठीच पाचारण करण्यात आले आहे असे सांगून त्यांनी अटकपूर्व जामिनाला विरोध केला. एअरसेल मॅक्‍सिस प्रकरणात अटक टाळण्यासाठी चिदंबरम यांनी काल सत्र न्यायालयात आणि “आयएनएक्‍स मिडीया’ प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयाने चिदंबरम यांना तपास संस्थांना सहकार्य करण्याची सूचनाही केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button