breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘आयआयटी’ मुंबईच्या विद्यार्थ्यांना वर्षांला दीड कोटी रुपये पगार!

सर्वाधिक पगाराची मायक्रोसॉफ्टची ऑफर

आयआयटी मुंबईच्या दीडशे विद्यार्थ्यांना कॅम्पस मुलाखतीपूर्वीच कंपन्यांनी नोकरी देऊ केली आहे. मायक्रोसॉफ्टने सर्वाधिक म्हणजे वार्षिक दीड कोटी रुपये पगार देऊ केला आहे, तर वर्षांला २५ लाख रुपयांपेक्षा अधिक पगार देणाऱ्या कंपन्यांची संख्याही वाढली आहे.

आयआयटीमध्ये ‘प्लेसमेंट’ मुलाखतींचे सत्र सुरू झाले आहे. मायक्रोसॉफ्टने दीड कोटी वार्षिक पगाराचा प्रस्ताव विद्यार्थ्यांसाठी ठेवला आहे. अमेरिकेतील शाखेसाठी कंपनीने उमेदवारांची निवड केली आहे. यंदा मुलाखती देण्यापूर्वीच १५६ विद्यार्थ्यांना नोकरीचे प्रस्ताव आले होते.

विद्यार्थ्यांना अनेक मुलाखती द्याव्या लागू नयेत आणि कंपन्यांनाही निवड करणे सोपे जावे म्हणून आयआयटीने यंदा मुलाखतींचे सत्र सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली होती. या परीक्षेच्या गुणांची यादी इच्छुक कंपन्यांना देण्यात आली. त्या आधारे विविध कंपन्यांनी विद्यार्थ्यांपुढे नोकरीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यातील १२६ विद्यार्थ्यांनी नोकरी स्वीकारली आहे. यंदा पहिल्या तीन दिवसांमध्ये २७५ कंपन्यांचे नोकरीचे ८०० प्रस्ताव आयआयटी मुंबईकडे आले आहेत. त्यासाठी संस्थेतील १ हजार ६५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button