breaking-newsमनोरंजन

आमिरच्या ‘महाभारत’ सिनेमात सलमान खान साकारणार ‘ही’ भूमिका

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या ‘महाभारत’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटात सलमान खानने काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आमिरच्या ‘महाभारत’ या चित्रपटात सलमान खान भगवान कृष्ण यांची भूमिका साकारु शकतो.

मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटात आमिर खान ‘कर्ण किंवा अर्जुना’च्या भूमिकेत आपल्याला दिसू शकतो. त्याचबरोबर असेही कळतेय की अमिताभ बच्चन यांना आमिर खानने धृतराष्ट्रची भूमिका साकारण्याची ऑफर दिली आहे. या चित्रपटात द्रौपदीची भूमिका दीपिका पादुकोणने साकारावी अशी आमिर खानची इच्छा आहे. दीपिका पादुकोणकडे द्रौपदीच्या भूमिकेसाठी नैसर्गिक आवाज आहे असे आमिरचे म्हणणे आहे. हा चित्रपट पाच भागांमध्ये तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक चित्रपट दोन वर्षांच्या कालावधी नंतर रिलीज केला जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button