breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार महेश लांडगे यांचा भविष्यकाळ उज्ज्वल – अमृता फडणवीस

  • भोसरीत इंद्रायणी थडी जत्रेचा शानदार समारोप

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – प्रत्येक स्त्री शुर असते. तिला आपले अस्तित्व सिध्द करण्यासाठी संधी मिळाली पाहिजे. ती संधी आमदार महेश लांडगे यांनी इंद्रायणी थडीच्या माध्यमातून हजारों महिलांना उपलब्ध करुन दिली. जनतेवर प्रेम करणा-या या आमदारांचे भविष्य उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन अमृता फडणवीस यांनी भोसरी येथे केले.

शिवांजली सखी मंचने संयोजन केलेल्या आणि महेशदादा स्पोटर्स फाऊंडेशनने आयोजित केलेल्या ‘इंद्रायणी थडी’ चा समारोप सोमवारी (दि. 11 फेब्रुवारी) फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी निमंत्रक आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, संयोजिका पूजा महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, कामगार नेते सचिन लांडगे, महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा स्विनल म्हेत्रे, शिक्षण मंडळ अध्यक्षा सोनाली गव्हाणे, ‘ई’ क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षा भीमाबाई फुगे, ‘क’ क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षा नम्रता लोंढे आदींसह नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.

अमृता फडणवीस म्हणाल्या की, शुर सैनिकांचा गौरव करुन शिवांजली सखी मंचने देशप्रेमाची भावना सर्वांमध्ये प्रज्वलीत केली. तसेच अनाथ मुलांचा सांभाळ करणा-या सिंधुताईंना मदतीचा धनादेश दिला. यातून सामाजिक उत्तरदायित्व लांडगे कुटूंबियांनी स्विकारल्याचे दिसते. हि त्यांची वाटचाल इतरांना प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. बॅंकेंचे एनपीए वाढत असताना महिला बचत गटांनी चिकाटीने प्रामाणिकपणे कर्ज फेडले आहे. इंद्रायणी थडीमध्ये सहभागी झालेल्या बचत गटांना आता कर्ज पुरवठा, कौशल्य विकास, उत्पादन, विपनण व मार्गदर्शन मिळाले पाहिजे. स्त्रियांनी देखील आता उंबरठा ओलांडून आपले विचार व आपले गुणकौशल्य समाजापुढे मांडले पाहिजेत. यातूनच भक्कम राष्ट्राची उभारणी होईल. आपली परंपरा जपतच मॉर्डन झाले पाहिजे. हि परंपरा इंद्रायणी थडीत जपली आहे.

  • बैलगाडीत बसण्याची इच्छा पूजाताईंनी पूर्ण केली
  • माझी लहान पणापासूनची बैलगाडीत बसण्याची इच्छा पूजा लांडगे यांनी पूर्ण केली. असे अमृता फडणवीस म्हणाल्या. यावेळी अमृता फडणवीस यांचा शिवांजली सखी मंचच्या वतीने भक्ती शक्ती शिल्प प्रतिकृती आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. अमृता फडणवीस यांच्या हस्ते सिंधूताई सपकाळ यांना 51 हजारांचा धनादेश देण्यात आला. शुर सैनिकांचा आणि सहभागी बचत गटांचा सत्कार अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

स्वागत, प्रास्ताविक आमदार महेश लांडगे, सुत्रसंचालन विजय फुगे आणि आभार महापौर राहुल जाधव यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button