breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

आमदार पुत्राला हटकल्याने महिला पोलिस उपनिरीक्षकांवर कारवाई

पिंपरी – नाशिक फाटा उड्डाणपुलावर मित्र-मैत्रिणीबरोबर मध्यरात्री एकच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करणा-या आमदार पुत्राला हटकल्याने महिला उपनिरीक्षकाला कारवाईला सामोरे जावे लागले आहे. आमदारांच्या तक्रारीवरुन वरिष्ठांनी पोलीस उपनिरीक्षक महिलेला नोटीस बजाविली. तसेच त्यांची खातेनिहाय चाैकशी करुन  त्या पोलिस अधिकारी महिलेवर खात्यातंर्गत कारवाईत येणार आहे. तसेच यापुढे लोकप्रतिनिधी अथवा त्यांचे नातेवाईक यांच्याशी उद्धट वर्तन करू नये, अशी सक्त ताकीदही देण्यात आली. दरम्यान, लोकप्रतिनिधींच्या तक्रारीवरून पोलीस अधिका-यांना अशा मानहानीकारक कारवाईला सामोरे जावे लागल्याने त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण होत असल्याचे चर्चा पोलीस खात्यात सुरु आहे. 

शिवसेनेचे पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचे चिरंजीव मित्र-मैत्रिणींना बरोबर घेऊन कासारवाडीतील उड्डाणपुलावर वाढदिवस साजरा करीत होते. काही जण फटाके फोडण्याच्या तयारीत होते. मध्यरात्री एकच्या सुमारास भररस्त्यात जल्लोषात वाढदिवस साजरा करण्याचा त्यांचा कार्यक्रम सुरू होता. पोलीस उपनिरीक्षक रुपाली पाटील यांच्या ही बाब निदर्शनास आली असता, त्यांनी ग्रुपला हटकले. रात्रीच्या वेळी सार्वजनिक शांततेचा भंग होईल, असे काही करू नका, असे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्या वेळी आमदारपुत्राने ‘मी आमदारांचा मुलगा आहे. तुम्ही आम्हाला येथे वाढदिवस साजरा करण्यास मज्जाव करू शकत नाहीत’ असे पाटील यांनाच दटावले. पोलिसांचे ऐकण्याच्या मन:स्थितीत कोणीही नव्हते. पालकांशी संपर्क साधून ‘पोलीस ठाण्यात भेटा’ असा निरोपही दिला. मात्र, या घटनेनंतर आमदार चाबुकस्वार यांनी थेट पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे पाटील यांची तक्रार केली.

तसेच मुलाच्या कानफटात मारली, असाही आरोप केला. २१ आॅक्टोबर २०१७ ला घडलेल्या या घटनेसंबंधी आलेल्या तक्रारीची पोलीस आयुक्त शुक्ला यांनी गंभीर दखल घेतली. तसेच पाटील यांच्यावर कारवाई केली आहे. अशा कारवाईमुळे पोलीस अधिकारी, कर्मचा-यांचे मनोबल खच्ची होते, अशी खंत व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींकडून अधिकाराचा गैरवापर होत असल्याबद्दलही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कासारवाडी येथे आॅक्टोबर २०१७ मध्ये मुलाला वाढदिवस साजरा करताना, पोलीस अधिकारी महिलेने हटकले. उद्धट वर्तन केले. याबाबत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे पोलीस अधिकारी महिलेची तक्रार केली होती. किरकोळ प्रकार असल्याने त्याकडे नंतर दुर्लक्ष केले. याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर पुढे काय झाले, याबद्दल माहिती नाही. त्यामुळे आता काही सांगता येणार नाही.

– गौतम चाबुकस्वार, आमदार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button