breaking-newsराष्ट्रिय

आमचे सर्व आमदार आमच्या बरोबर…

बंगळुरू : कॉंग्रेसचे सर्व नवनिर्वाचित आमदार आमच्या बरोबरच असून आम्ही उद्याच्या शक्तीपरिक्षणाच्यावेळी या सर्वांना तेथे उपस्थित ठेऊ असे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी म्हटले आहे.

कर्नाटकातील सरकारला सर्वोच्च न्यायालयाने उद्याच बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. ते म्हणाले की बहुमतासाठी या राज्यात किमान 112 आमदारांची आवश्‍यकता आहे आणि त्यांच्या कडे केवळ 104 आमदार आहेत. या व्यतिरिक्त जे दोन अपक्ष आमदार निवडून आले आहेत तेही आमच्याबरोबरच आहेत असे ते म्हणाले.

कर्नाटकचे राज्यपाल हे घटनेला धरून वागत नाहीत. ते मोदी आणि अमित शहा यांच्या सांगण्यावरूनच हे निर्णय घेत आहेत. जर ते घटनेला धरून वागत असते तर त्यांनी येडियुरप्पा यांना सरकार स्थापन करण्यास पाचारणच केले नसते आणि त्यांना पंधरा दिवसांची मुदत दिली नसती. मोदी शहा ही जोडगोळी हिटलरशाही करीत असून त्यांनी देशाची घटना पायदळी तुडवली आहे असा आरोपही त्यांनी केला. कॉंग्रेसच्या एका आमदाराला केंद्र सरकारनेच पळवून नेल्याची माहिती कॉंग्रेस सरचिटणीस गुलामनबी आझाद यांनी यावेळी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button