breaking-newsआंतरराष्टीय

आबुधाबीचे युवराज पाकिस्तानच्या भेटीवर ; पाकला 6.2 अब्ज डॉलरची मदत देण्याची शक्‍यता

इस्लामाबाद– आबुधाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन झ्यायेद बिन सुलतान अल नह्यान यांनी आज पाकिस्तानमध्ये जाऊन पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली. पाकिस्तानने आबुधाबीकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. त्यानुसार आबुधाबीकडून पाकिस्तानला मोठी आर्थिक मदत दिली जाण्याची शक्‍यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये मोठी आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. इम्रान खान यांनी ऑगस्ट महिन्यात पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून सौदी अरेबिया, चीन आणि संयुक्‍त अरब अमिरातीसह काही प्रमुख देशांशी यासंदर्भात चर्चा सुरु आहे.

आबुधाबीचे युवराज जवळपास 12 वर्षांनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यवर गेले आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांनी नूर खान विमानतळावर त्यांचे स्वागत केले. आबुधाबीच्या युवराजांसह त्यांचे उच्चस्तरिय शिष्टमंडळही पाक दौऱ्यावर असून त्यांनी पाक अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. इम्रान खान ऑगस्टपासून दोन वेळा आबुधाबीला गेले होते. यावेळी पाकिस्तान आणि संयुक्‍त अरब अमिरातीमध्ये गेल्या आठवड्यात 6.2 अब्ज डॉलरच्या मदतीच्या पॅकेजबाबत एकमत झाले आहे. या पॅकेजची घोषणा युवराज करण्याची शक्‍यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button