breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

आपला पाळणा हलणार, की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार?”, भाजपविरोधात राष्ट्रवादीची पोस्टरबाजी

मुंबई – पश्चिम महाराष्ट्रातील  दिग्गज राजकीय नेते विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या घराण्यातील युवा नेते रणजितसिंह मोहिते-पाटील तसेच सुजय विखे-पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. त्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत भाजपाविरोधात बॅनरबाजी केली आहे. त्याद्वारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज नेत्यांना भाजपात सामावून घेतल्यावरून टीका केली आहे. “ज्यांना आम्ही नाकारले, हाकलले, त्यांनाच तुम्ही स्वीकारले, गोंजारले. आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार?”, अशी टीका या बॅनरद्वारे करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होताच आयाराम- गयारामांचे पर्वही सुरु झाले आहे. सुरुवात राधाकृष्ण विखे- पाटील यांचे पूत्र सुजय विखे यांच्या भाजपा प्रवेशाने झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगरची जागा सोडण्यास नकार दिल्याने सुजय विखे यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. त्यापाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर अशा मोहिते- पाटील घराण्यातील रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला. रणजितसिंह मोहिते- पाटील यांना माढ्यातून उमेदवारी देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने नकार दिला होता.

महाराष्ट्रासह देशभरात विविध पक्षांमधील नेते भाजपात प्रवेश करत असतानाच राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मुंबईत भाजपाविरोधात पोस्टरबाजी सुरु केली आहे. मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पोस्टर लावले आहेत. “ज्यांना आम्ही नाकारले, हाकलले त्यांनाच तुम्ही स्वीकारले,गोंजारले. आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार?”, अशी बोचरी टीका या  बॅनरद्वारे करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button