breaking-newsराष्ट्रिय
आपत्तीग्रस्त राज्यांसाठी केंद्राची 1161 कोटी रूपयांची मदत
नवी दिल्ली – पूर, वादळ, दरडी कोसळणे, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशासाठी केंद्र सरकारने आज एकूण 1161 कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे. त्यात राजस्थानला 526 कोटी 14 लाख, आसामला 480 कोटी 37 लाख, हिमाचल प्रदेशला 84 कोटी 60 लाख, सिक्कीमला 67 कोटी 40 लाख आणि लक्ष्यद्विपला 2 कोटी 16 लाखांची मदत दिली जाणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री राधामोहनसिंग यांनी म्हटले आहे.
आज राधामोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्याला गृह विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. बैठकीत घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार राज्यनिहाय मदतीची ही घोषणा करण्यात आली.