breaking-newsताज्या घडामोडीपुणे

आधी दिल्लीतील प्रश्न सोडवा, खासदारांना आमदार जगतापांचा सल्ला

पिंपरी –  केंद्र शासनाच्या अखात्यारित असलेले रेडझोन, हिंदुस्थान अॅंन्टीबायोटिक्स कंपनीच्या कामगारांच्या वेतनाचा प्रश्न, संरक्षण हद्दीतील बोपखेलसह अन्य रस्त्यांचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. ते प्रश्न सोडवण्याकडे खासदार श्रीरंग बारणे यांचे दुर्लक्ष झालेले आहे. त्यांना केंद्रातील  प्रश्न सोडवण्याएेवजी गल्लीतील प्रश्नांवर अधिक रस आहे. परंतू, शास्तीकर, अनधिकृत बांधकामाचे प्रश्न सोडविण्यास आम्ही सक्षम आहोत, तुम्ही केंद्राच्या प्रश्नांकडे बघा, असा सल्ला भाजपचे शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापाैर नितीन काळजे, आमदार महेश लांडगे, उपमहापाैर शैलेजा मोरे, सभागृह नेता एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, आझम पानसरे उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले की, शास्तीकर, अनधिकृत बांधकाम यासह प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या हालचाली दिसताच, खासदारांना महामोर्चा काढण्याचे सुचले आहे. शहराच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्याचे लक्ष असून त्यांनी शहराचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. मावळ, शिरुर लोकसभा मतदार संघात भाजपाचे आमदार, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती यासह सर्वाधिक वर्चस्व आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीवेळी भारतीय जनता पक्षाकडे या दोन्ही जागेवर आम्ही दावा करणार आहोत. त्यामुळे तेथून भाजप पक्षाकडून सक्षम उमेदवार देवून निवडणूक लढविली जाणार आहे,

तसेच पोलीस स्टेशन, चाैक्या हप्ता वसुलीचे केंद्र झाल्याच्या वक्तव्यांचा देखील त्यांनी खरपूस समाचार घेत ते म्हणाले की,  पिंपरी-चिंचवड शहराचे डीसीपींना याविषयी चाैकशी करण्याचे सुचना केलेल्या आहेत. हप्ता वसुली कुठे सुरु आहे, ते खासदारांनी निर्देशनास आणून द्यावेे, त्यामुळे पोलीसांना चाैकशी करण्यास अडचण होणार नाही. शहरात पोलीस आयुक्तालय 1 मे नंतर सुरु होईल, त्यासाठी जागेची पाहणी सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button