breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या सीईआे रेखा दुबेसह तिघांवर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

– आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णाला डांबून ठेवल्याचा ठपका

पिंपरी – थेरगांव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाने आर्थिक दुर्बल घटकातील एका रुग्णावर मोफत उपचार न करता उपचाराचे पैसे न दिले नाही म्हणून रुग्णाला डांबून ठेवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात रुग्णालयाच्या सीईआे रेखा दुबे यांच्यासह तिघा विरोधात रुग्णाला डांबून ठेवणे, मारहाण करणे, यानूसार बुधवारी (दि.22) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी संजय दशरथ आरडे ( रा. कैलासनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली. यामध्ये रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे, राजेश दुबे आणि सुरक्षारक्षक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.

“दशरथ शिवाजी आरडे (वय ७२, रा. कैलासनगर, पिंपरी) यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना  ८ ऑगस्ट  रोजी चिंचवड  येथील आदित्य बिर्ला            रुग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारासाठी त्यांनी रुग्णालयात  दहा हजार रुपये भरले.  तसेच रुग्णालयाने त्यांना  औषधे बाहेरून आणण्यास लावले.  त्यामुळे त्यांनी औषधांवरही हजारो रुपये खर्च केले आहेत.

वास्तिवक दशरथ आरडे हे आर्थिक दुर्बल घटकांतील आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आदित्य बिर्ला रुग्णालयात                                मोफत उपचार होणे हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे.  आर्थिक दुर्बल घटकात मोडत असल्याचे सर्व कागदोपत्री पुरावे त्यांनी रुग्णालय  व्यवस्थापनाला दाखविले.                       तरीही रुग्णालयाने  त्यांच्यावर  मोफत उपचार केले नाहीत.  उपचारानंतर  त्यांना ११ ऑगस्ट रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज  देण्यात आला. परंतु, उपचाराचा खर्च देण्याची त्याची आर्थिक परस्थिती नव्हती. तरीही रुग्णालयात त्यांना नऊ दिवसापासून त्यांना सोडलेले नाही.

 तसेच त्यांचे औषध व जेवणही बंद करण्यात आले होते. त्यांच्या नातेवाइकांनाही त्यांना भेटू दिले जात नाही. दशरथ आरडे यांना रुग्णालयाच्या सीईओ रेखा दुबे यांनी अक्षरशः  डांबून ठेवले होते. त्यामुळे रुग्णालय व्यवस्थापन व सीईओ रेखा दुबे, राजेश दुबे यांच्यावर फसवणूक व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अजिज शेख यांनी पोलीस आयुक्त आर.के. पद्यनाभन यांच्याकडे केली होती.

दरम्यान, रुग्णालय सीईओ रेखा दुबे, राजेश दुबे आणि सुरक्षारक्षका विरुध्द आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णाला डाबून ठेवणे, नातेवाईकांना धक्काबुक्की करणे, मारहाण करणे यानूसार वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button