breaking-newsराष्ट्रिय

आता १०० रुपयांचं नाणं, वाजपेयींच्या स्मरणार्थ मोदींनी केलं अनावरण

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १०० रुपयांचं नाणं जारी केलं आहे. वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त २५ डिसेंबर हा दिवस केंद्र सरकारकडून ‘सुशासन दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे. संसदेच्या अॅनेक्सी भवनात मोदींनी या नाण्याचं अनावरण केलं.

कसं आहे १०० रुपयांचं नाणं –
१०० रुपयांच्या नाण्याच्या पुढील भागात अशोक स्तंभ आणि त्याच्या खाली देवनागरी लिपीत सत्यमेव जयते असे लिहिले आहे. नाण्यावर देवनागरी लिपीत भारत आणि रोमन अक्षरांत INDIA असं लिहिलं आहे. प्रतिक चिन्हाच्याखाली १०० असे नाण्याचे मुल्य लिहिले आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो आणि देवनागरी व रोमन लिपीमध्ये त्यांचे नाव लिहिलेले आहे. तसेच त्यांच्या जन्म आणि मृत्यूचे वर्ष १९२४ – २०१८ लिहिले आहे.

नाणं अनावरण करताना मोदी म्हणाले, आज काही जणांसाठी सत्ता ऑक्सिजनप्रमाणे आहे. ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. मात्र वाजपेयी अधिकांश काळ विरोधीपक्षात होते पण त्यांनी त्यांच्या विचारधारेशी तडजोड कधीच केली नाही. लोकशाही बळकट व्हावी अशी वाजपेयींची इच्छा होती, त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण करु, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button