breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

आता हवा-बिवा काय नाय, मावळच्या विकासासाठी घड्याळाचं बटन दाबा

  • सांगवी-पिंपळे गुरव येथील महिलांच्या कार्यक्रमात पार्थ पवार यांचे आवाहन

नवी सांगवी ( महा ई न्यूज ) – नवी सांगवी – पिंपळे गुरव परिसरात श्री राम नवमी आणि श्री हनुमान मंदिर जयंती आज (शुक्रवारी) उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाला राॅष्ट्रवादी-काॅंग्रेस मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी भेट दिली. यावेळी महिला भगिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पार्थ पवार म्हणाले की, नवी सांगवी आणि पिंपळे गुरव ग्रामोत्सव श्रीराम नवमी व श्री हनुमान मंदिर जयंती कार्यक्रमाला येण्यास खुपच उशिर झाल्याबद्दल मी उपस्थित सर्व महिला भगिंनीची क्षमा मागतो. पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालट ज्याप्रमाणे झाला. त्याप्रमाणे मावळ लोकसभा मतदार अन्य तालुक्याचा विकास करायचा आहे. तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील देखील लष्कराच्या हद्दीतील रस्ते, रेडझोन यासह अनेक प्रलंबित प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे आहेत. त्याचबरोबर मावळात महिलांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी टेक्सटाईल पार्क, डे केअर सेंटर, बालकांचे स्वतंत्र हाॅस्पीटल ही कामे मला करायची आहेत. सर्वात महत्वांचे म्हणजे बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे. त्यामुळे आता गेल्या पाच वर्षात असणारी हवा-बिवा काय नाय, त्यामुळे मावळच्या विकासासाठी घड्याळाचं बटन दाबा, आणि हे भाजप-शिवसेनेचे सरकार उलथवून टाका, असे आवाहन पार्थ पवार यांनी केले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button