breaking-newsमनोरंजन

आता चीनमध्ये प्रदर्शित होणार “टॉयलेट : एक प्रेम कथा’

बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री भूमि पेडणेकर यांचा सुपरहिट ठरलेला “टॉयलेट ः एक प्रेमकथा’ या चित्रपटाने भारतातील बॉक्‍स ऑफीसवर धमाल करत कोट्यवधी रुपयांचा गल्ला कमविला होता. आता हा चित्रपट चीनमध्येही प्रदर्शित होणार आहे.

बॉलीवुडमधील चित्रपटांनी आता चीनच्या बॉक्‍स ऑफीसवरही कब्जा केला असून येथे चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी चीनमध्ये सलमान खानचा “बजरंगी भाईजान’, इरफान खानचा “हिंदी मीडियम’ आणि “बाहुबली’सह अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शीत झाले आहेत. या चित्रपटांनी चीनमध्ये चांगली कमाई केली होती.

अक्षय कुमारच्या “टॉयलेट ः एक प्रेम कथा’ या चित्रपटासाठी सुमारे 30 कोटी रुपयांचा खर्च आला होता. या चित्रपटाने आतापर्यंत 135 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्री नारायण सिंह यांनी केले आहे. या चित्रपटातील दोन्ही मुख्य कलाकारांमधील अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी “गोल्ड’ चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्‍शनमध्ये व्यस्त आहे. तर भूमी पेडणेकर ही सुशात सिंह राजपूतसोबत “सोन चिरैया’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक चौबे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button