breaking-newsराष्ट्रिय

आता कर्नाटकमधील आमदारांसाठी बोली लागणार-यशवंत सिन्हा

नवी दिल्ली: आयपीएलच्या धर्तीवर आता कर्नाटकातील आमदारांचा लिलाव होईल, अशा शब्दांमध्ये भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी कर्नाटकमधील राजकीय परिस्थितीवरुन भाजपावर टीका केली आहे. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी बहुमत नसतानाही भाजपाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिल्याने सिन्हा यांनी जोरदार टीका केली. ‘राज्यपालांच्या निर्णयामुळे आता आयपीएलच्या धर्तीवर आमदारांचा लिलाव होईल, त्यांच्यासाठी बोली लागेल,’ असे सिन्हा यांनी म्हटले.

‘भाजपाकडे सत्ता स्थापनेसाठी बहुमत नाही. त्यांना आठ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत भाजपा बहुमत कसे काय सिद्ध करणार? दुसऱ्या पक्षातील काही आमदार फोडूनच त्यांना बहुमत सिद्ध करावे लागले,’ असे सिन्हा यांनी म्हटले. राष्ट्रीय मंचाकडून ‘घटना बचाव’ आंदोलन सुरू असताना ते बोलत होते. भाजपाला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण देणाऱ्या राज्यपाल वजुभाई वाला यांच्या भूमिकेबद्दल त्यांनी संशय व्यक्त केला. राज्यपाल एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यासारखे वागू लागले, तर लोकशाही कशी चालणार?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button