breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘आठवणीतले अटलजी’, उद्या निगडीत कवितांचे वाचन

पिंपरी:- निगडीतील, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने  भारतरत्न दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी उद्या (गुरुवारी) विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अटलजींच्या कवितांचे वाचन  केले जाणार आहे. तसेच ‘अटलजींच्या आठवणी’ माजी आमदार विश्वासराव गांगुर्डे सांगणार आहेत, अशी माहिती मंडळाचे  सहसचिव प्रदीप पाटील यांनी दिली. 

निगडी, प्राधिकरणातील सावरकर सदनात उद्या (गुरुवारी) सायंकाळी सात वाजता हे कार्यक्रम होणार आहेत.
मृत्यू अटल है, पर अटल अमर है। या वाक्याचा भावार्थ म्हणजे देहाने अटलजी आज आपल्यात नसले तरी उत्तम वक्ता, कवी, स्वयंसेवक, दूरदृष्टी , दुर्दम्य इच्छाशक्ती, अजातशत्रू व कुशल राजकीय नेता हे त्यांचे व्यक्तीमत्व आपल्याला व येणा-या पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे. श्रध्दांजली कार्यक्रमात अटलजींच्या  आठवणी माजी आमदार विश्वास गांगुर्डे सांगणार आहेत.  तसेच मान्यवर साहित्यिक  अटलजींच्या कवितांचे वाचन करणार आहेत. यावेळी फिल्मच्या माध्यमातून अटलजींचे विचार व भाषणे दाखवली जाणार आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button