breaking-newsमहाराष्ट्र

आगामी काळात दुग्धव्यवसाय वाढणार

मुंबई – पराग मिल्कचे एक सक्षम एफएमसीजी डेअरी कंपनी बनण्याचे लक्ष्य असून आमचा ग्राहक वाढवण्यावर आम्ही जास्त भर देणार आहोत. नवीन ज्येष्ठ नेतृत्वाच्या टीमच्या मदतीने, आम्ही या आर्थिक वर्षात 10 टक्‍क्‍यापेक्षा जास्त वाढ साध्य करण्याकडे लक्ष देणार आहोत, असे पराग मिल्क फूडसे अध्यक्ष देवेंद्र शाह यानी सांगितले. दुग्धव्यवसायात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे, कंपनीला दुहेरी आकड्यातील वाढीची अपेक्षा आहे. कंपनीला चीज प्रकारातील उत्पादने त्यांना वाढवायची आहेत. चीज हे सुपर फूड मानले जाते त्यामुळे त्यातील उत्पादन वाढवायची त्यांची इच्छा आहे व बाजारपेठेतील मागणी 20-25 टक्‍क्‍यांनी वाढेल असा अंदाज आहे, असे ते म्हणाले.

कंपनीने चीफ फायनान्शियल ऑफिसर या पदावर विमल आगरवाल, सीओओ पावर अमरेंद्र साठे, सीनियर व्हाइस प्रेसिडेंट या पदावर निहारेंदु सरकार यांची नियुक्ती केलेली आहे. कंपनीच्या सध्याच्या 3,800 वितरकांना अधिक सक्षम करून एफएमसीजी व्यवसायातील वितरण अधिक वाढवण्याचे कंपनीचे नियोजन आहे. उत्तर भारतातील दानोने प्लॅंट अलीकडेच ताब्यात घेतल्यानंतर, पराग मिल्क फूडसला आता त्या क्षेत्रातील बाजारपेठेतील त्यांचा हिस्सा वाढवायचा आहे आणि त्यासाठी या भागातील व्यवसायाच्या वाढीसाठी रजनीश वासुदेव यांची निवड केली .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button