breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आकुर्डीत मंत्री तानाजी सावंत आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांचा सत्कार

  • आकुर्डीतील खंडोबा मंदिर कार्यालयात स्नेहमेळाव्याचे आयोजन
  • भूम, वाशी, परंडा रहिवाशी संघाची पत्रकार परिषदेत घोषणा

पिंपरी, (महाईन्यूज) – उस्मानाबात जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी येथील पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायीक झालेल्या रहिवाशांच्या वतीने रविवारी (दि. 21) स्नेहमेळवा घेण्यात येणार आहे. जलसंधारण मंत्री डॉ. प्रा. तानाजी सावंत व उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती भूम, परंडा, वाशी रहिवासी पिंपरी-चिंचवड संघाचे अध्यक्ष युवराज कोकाटे व निमंत्रक चंद्रकांत सरडे यांनी पिंपरी येथे बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

आकुर्डी चौकातील खंडोबा मंदिर कार्यालयात रविवारी (21 जुलै) दुपारी अडीच वाजता स्नेहमेळावा होईल. खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार गजानन बाबर, आमदार एड. गौतम चाबुकस्वार, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, शिवसेना कामगार नेते इरफान सय्यद, भूम तालुका शिवसेना प्रमुख सुरेश कांबळे, पुणे मनपा शिवसेना गटनेते अशोक हरणावळ आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

स्नेहमेळाव्याच्या आयोजनात दीपक गटकळ, कैलास कुदळे, सचिन शिंदे, भाऊ हरणावळ, सुजाता गजरमल, पप्पू वायसे, सुर्यकांत देशमुख, रामराजे सावंत, प्रवीण चव्हाण, अंकुश गायकवाड, प्रितम मेटे, पप्पू पाटोळे, दीपक कांबळे, शरद जाधव, निलेश चव्हाण, जयराम लांडगे, खंडू कोळी, माऊली जाधव, बालाजी महाजन, संतोष बाबर, विशाल जाधव, कुश कोकाटे, शहाजी कारकर, संतोष सुर्यवंशी आदींनी सहभाग घेतला आहे.

स्नेहमेळाव्यास भूम, परंडा, वाशी येथून पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक झालेल्या नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन युवराज कोकाटे व चंद्रकांत सरडे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button