breaking-newsआंतरराष्टीयराष्ट्रिय

आईचा वाढदिवस साजरा करण्याचं स्वप्न अपूर्ण , अमेरिकेत आणखी एका भारतीयाची हत्या

अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे 61 वर्षीय भारतीय वंशाच्या व्यक्तीची एका अल्पवयीन तरुणाने गोळ्या झाडून हत्या केली आहे. सुनील एडला असं मृत व्यक्तीचं नाव असून या प्रकरणी 16 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली, तर रविवारी त्यांच्या खुन्याला अटक करण्यात आली.

View image on Twitter

ANI

@ANI

61-year-old Sunil Edla, from Telangana’s Medak, was shot dead by a 16-year-old boy in New Jersey’s Ventnor city on November 15 . The culprit has been arrested by Police.

30 people are talking about this

सुनील हे गेल्या 30 वर्षांपासून अटलांटिक काउंटी येथे वास्तव्यास होते. अटलांटिक सिटीच्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये ते कामाला होते. सुनील एडला मूळचे भारतातील तेलंगणामधील मेदकचे रहिवासी होते. यापूर्वी तेलंगणातीलच 32 वर्षीय अभियंता श्रीनिवास कुचिभोटला यांची 23 फेब्रुवारीला गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. तर 10 फेब्रुवारीला तेलंगणातीलच वामिशी रेड्डी यांची हत्या करण्यात आली होती. गुरूवारी रात्री सुनील आपल्या घरातून नाईट शिफ्टसाठी निघाले होते. त्यांनी आपली कार सुरू केली पण पुन्हा ते कारमधून उतरून घरात गेले. त्यानंतर पुन्हा कारकडे निघाले असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, अशी माहिती सुनील यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.

अटक करण्यात आलेला आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची ओळख सार्वजनिक करण्यात आलेली नाही. मात्र, त्याने सुनील यांची हत्या का केली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. खून, लुटमार, कार चोरी करणे आणि बेकायदेशीरपणे हत्यार बाळगणे असे आरोप अटक करण्यात आलेल्या आरोपीवर लावण्यात आले आहेत.

27 नोव्हेंबर रोजी आईच्या 95 व्या वाढदिवसासाठी आणि ख्रिसमस साजरी करण्यासाठी सुनील हे भारतात येणार होते, मात्र आईचा 95 वा वाढदिवस साजरा करण्याचं त्यांचं स्वप्न अपूर्णच राहिलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button