breaking-newsपुणेमहाराष्ट्र

…असे घडले आधुनिक नवदुर्गेचे दर्शन

पोलीस कर्मचारी त्यांचे कर्तव्य चोखपणे पार पाडतात हे जरी खरे असले तरी पोलिस कर्मचारी असलेल्या महिलेतील नवदुर्गेचे दर्शन घडले आहे. मनिषा विसपुते या ठाण्यातील खेरवाडी येथे रात्रपाळीसाठी होत्या. विसपुते या वांद्रे येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर रेल्वे ब्रीज, ॲन्टीचैन स्नॅचिंग पाईंट येथे ड्युटीवर होत्या. त्यावेळी सकाळी ८.३० च्या सुमारास त्यांच्यापासून काही अंतरावर मोटार सायकलवरुन आलेली एक व्यक्ती अत्यवस्थ होऊन अचानक रस्त्याच्या कडेला बसल्याचे विसपुते यांना दिसले. त्यांनी सतर्कतेने या व्यक्तीच्या जवळ जाऊन चौकशी केल्यावर ते ठाण्यातील आरे पोलिस ठाण्यातील पोलीस शिपाई किरण सांगळे असल्याचे समजले. त्यांच्या छातीत दुखत असल्याने ते रस्त्याच्या कडेला थांबल्याचे त्यांनी सांगितले. विसपुते यांनी सांगळे यांना त्वरीत रुग्णालयात दाखल केले.

आता त्यांच्यावर अंधेरीतील मरोळ भागात असणाऱ्या सेवन हिल्स हॉस्पिटल येथे उपचार चालू आहेत. मनिषा विसपुते यांनी क्षणाचाही विलंब न करता परिस्थीतीचे गांभीर्य ओळखून हे काम केल्याने सांगळे यांना वेळेत उपचार मिळाले. त्या आता नुकतीच चारचाकी शिकल्या असून चालक म्हणूनही त्या कर्तव्य बजावत आहेत. घडलेल्या घटनेची त्यांनी पश्चिम प्रादेशिक नियंत्रण कक्षास माहीती दिली व नियंत्रण कक्षाचे परवानगी घेऊन पुढील आवश्यक त्या गोष्टी केल्या. पोना निकम यांच्या मदतीने विसपुते यांनी त्वरीत खेरवाडी येथील वाहनातून कौशल्यपूर्वक वाहन चालवत सांगळे यांना सेवन हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यामुळे त्यांना त्वरीत वैद्यकीय मदत मिळाली. त्यांच्या या कर्तव्यदक्षपणा दाखवत केलेल्या कामगीरीचे वरिष्ठांनी व सहकारी कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पोलीस खात्यातील नवदुर्गेचे दर्शन घडले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button