breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अवैध धंदे बंद करण्यासाठी निगडी पोलीस ठाण्यावर बाटली मोर्चा

निगडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना निवेदन

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंद्याविरोधात अपना वतन संघटनेच्या वतीने निगडी पोलीस ठाण्यावर “बाटली मोर्चा” काढण्यात आला. अवैध दारू धंदे बंद करा, हफ्तेवसुली करणा-या पोलिसांवर कारवाई करा, शहरातील गुन्हेगारी थांबवा, अशा घोषणा देण्यात आल्या.

पिंपरी-चिंचवडमधील अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांच्या नेतृत्वाखाली अंकुश चौक ते निगडी पोलीस स्टेशनपर्यंत हा बाटली मोर्चा काढण्यात आला.निगडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पळसुले यांच्याशी सदरील मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. त्यांनी निगडी पोलीस ठाण्याच्या स्टेशनच्या हद्दीतील सर्व अवैध दारू धंदे बंद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. काही ठिकाणी जर अवैध धंदे निदर्शनास आल्यास पोलिसांना कळवावे, आम्ही तात्काळ कारवाई करू, असे लेखी आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले.

शेख म्हणाले की, निगडी पोलीस हद्दीसह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढलेली आहे. सर्वसामान्य जनता प्रचंड दहशतीखाली जगत आहे. तसेच शहरात काही भ्रष्ट पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध दारू धंदे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. अवैध धंदेवाल्यापसून करोडो रुपयाचा हफ्ता वसूल केला जात आहे. या अवैध धंद्यांमुळे महिलांचे संसार उध्वस्त होत आहेत. अनेक तरुण वाममार्गाला जाऊन गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहेत. त्यामुळे अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button