breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अल्पसंख्यांकांच्या हितासाठी युवासैनिकांचे आयोगाच्या अध्यक्षांना साकडे

  • बेरोजगारी हटविण्यासाठी बँकांकडून कर्जपुरवठा करा
  • मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शाळांना आदेश द्या

पिंपरी, (महाईन्यूज) – शहरातील अल्पसंख्यांकांना व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य मिळावे, शासकीय योजनांचा लाभ मिळावा, पाल्यांना चांगले शिक्षण घेता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी आरफत शेख यांच्याकडे पिंपरी विधानसभा मतदार संघातील युवा सनेतर्फे मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांचा विचार करून कार्यवाही तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेऊ, असे आश्वासन शेख यांनी युवासैनिकांना दिले आहे.

  • सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अल्पसंख्यांक घटकातील तरुणांच्या हाताला काम मिळत नाही. तुटपुंज्या वेतनावर त्यांच्याकडून खासगी अथवा निमशासकीय संस्थांकडून काम करवून घेतले जाते. अशा तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी त्यांना नामांकीत बँकांकडून पतपुरवठा उपलब्ध व्हावा. बँक व्यवस्थापनाला तत्संबंधीत आदेश देण्यात यावेत, अशी मागणी युवासैनिकांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील अल्पसंख्यांक घटकातील नागरिकांच्या असंख्य समस्या आहेत. नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी कागदपत्रांचा ससेमिरा लावला जातो. किचकट अटी, शर्तींमुळे लाभार्थ्यांना शासकीय कर्मचा-यांकडून मानसिक त्रास केला जातो. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी संस्थाचालकांना बंधनकारक करण्यात यावे. अनेक मुलांना आर्थिक परिस्थितीची बंधने येत असल्यामुळे चांगल्या शिक्षणापासून वंचित रहावे लागते. यावर तोडगा काढून सर्व मागण्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी युवासैनिकांनी चर्चेदरम्यान केली.

  • यावेळी युवती सेनाधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, युवा नेते सागर लांगे, उपविभाग संघटक सनी कड, युवा सेना शाखाधिकारी ओंकार जगदाळे, राहुल राठोड, अजय पिल्ले आदी उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button