breaking-newsपुणे

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरूणाला पोलीस कोठडी

पुणे – लग्नाचे अमिषाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी कोंढवा पोलीसांनी तरूणाला अटक केली. न्यायालयाने त्याला 31 मेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला.

अमर राजेसाहेब निंबाळकर (वय 23, रा. भांडगाव, ता. दौंड) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. ही घटना 15 मे 2018 रोजी सायकाळी 4 च्या सुमारास घडली. निंबाळकर याने अल्पवयीन पीडित मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिला भांडगाव येथे पळवून नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी निंबाळकर याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यामध्ये त्याला कोणी मदत केली आहे का? तसेच गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकीलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button