breaking-newsराष्ट्रिय

अलीगढमध्ये जिना यांच्या फोटोचा वाद पेटला

इंटरनेट सेवा बंद : पोलिसांच्या कारवाईविरोधात विद्यार्थ्यांचा पाच दिवस बहिष्कार
अलीगढ – अलीगढ मुस्लिम विद्यापीठात पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिना यांचा फोटो लावण्यावरून सुरू झालेल्या वाद अजून चिघळला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात विद्यार्थ्यांनी पाच दिवसांसाठी वर्गावर बहिष्कार टाकला, तर जिल्हा प्रशासनाने विद्यापीठातील इंटरनेट सेवा बंद केली. या प्रकरणानंतर येथील परिस्थिती तणावपूर्ण असून पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

एकीकडे जिना यांचा फोटो हटवण्यात यावा, अशी मागणी होत असताना विद्यार्थी मात्र हा फोटो इतिहासाचा भाग असून हटवणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. जिना आमच्यासाठी आदर्श नसले, तरी ते भारताच्या इतिहासाचा भाग आहेत, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. याशिवाय त्यांना विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेची आजीवन सदस्यत्व देण्यात आले होते.

वाद वाढवायचा नसेल तर विद्यार्थी संघटना आणि विद्यापीठ प्रशासन अधिकाऱ्यांनी बसून चर्चा करणे गरजेचे आहे, असे विद्यार्थ्यांचे मत आहे. तसेच यामध्ये बाहेरील लोकांनी हस्तक्षेप करून नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. याप्रकरणी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये काल वादातून झटापट होऊन 40 जण जखमी झाले होते. दुसरीकडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीगढ प्रशासनाकडे घटनेचा संपूर्ण अहवाल मागितला आहे. यादरम्यान विद्यापीठात पत्रकारांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button