breaking-newsराष्ट्रिय

अरुणाचलमध्ये दरडी कोसळून बसमधील पाच जवानांचा मृत्यू

इटानगर : अरुणाचल प्रदेशच्या लोअर सियांग जिल्ह्यात भूस्खलनामुळे प्रचंड आकाराची दरड इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांच्या बसवर कोसळल्याने पाच जवान मृत्युमुखी पडले, तर ६ जवान जखमी असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात शुक्रवारी पहाटे झाला.
लोअर सियांग जिल्ह्याच्या लिकाबाली या मुख्यालयाच्या कॅम्पमधून हे जवान बसने सीमेपाशी निघाले होते. त्याच वेळी मुख्यालयापासून पाच किलोमीटरवरच डोंगराचा मोठा भाग भाग प्रचंड आकाराच्या दगडासह पावसामुळे खाली आला आणि बसवर कोसळला. बसर-अकाजान मार्गावर हा अपघात झाला. बसमध्ये एकूण २0 जवान होते. ही संपूर्ण बसच त्या ढिगाऱ्याखाली दबली गेली. त्यामुळे जवानांना बाहेर काढण्यात खूप अडचणी आल्या. त्या वेळी जोरात पाऊ सही सुरू होता.
लोअर सिआंगच्या पोलीस अधक्षकांनी सांगितले की, भूस्खलनामुळे डोंगराचा काही भाग माती व प्रचंड आकाराच्या दगडासह आयटीबीपीच्या २० जवानांच्या मिनी बसवर जाऊन पडला. चार जवानांचा जागीच मृत्यू झाला. एकाचा मृत्यू रुग्णालयात झाला. सर्व जखमींना हेलिकॉप्टरने दिब्रुगडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्याच आठवड्यात इटानगर
या राजधानीच्या शहराजवळच भूस्खलन झाले होते. त्या वेळीही डोंगराचा प्रचंड भाग खाली आला होता. त्या वेळी तिथे ४ मजूर मृत्युमुखी पडले होते. दरवर्षी इरुणाचल प्रदेशात पावसाळ्यात सतत दरडी कोसळतात आणि भूस्खलनही होत असते. (वृत्तसंस्था)

रस्त्यांची अवस्था भयानक
संपूर्ण राज्यात रस्त्यांची अवस्थाही वाईट आहे. काही ठिकाणी कच्चे रस्ते, काही भागांत अरुंद रस्ते आणि काही भागांमध्ये रस्ते नसल्यात जमा अशी स्थिती आहे.
त्यामुळे वाहतूक कायम संथ गतीनेच सुरू असते. पावसाळ्यात तर त्या रस्त्यांवरून वाहने चालविणे ही कसरतच असते. सदर बसही संथ गतीनेच सुरू होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button