breaking-newsराष्ट्रिय

अयोध्याप्रश्नी सुप्रीम कोर्टात आज ५ सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी

संवेदनशील अयोध्या प्रकरणातील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमिनीच्या वादावर आज सुप्रीम कोर्टात ५ सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. या पीठाच्या अध्यक्षस्थानी सरन्यायाधीश रंजन गोगोई तर अन्य न्यायाधीशांमध्ये न्या. एस. ए. बोबडे, न्या. एन. वी. रमन्ना, न्या. यु. यु.लळीत आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांचा समावेश आहे. यापूर्वी ६ जानेवारी रोजी याप्रकरणी कोर्टाने केवळ अर्ध्या मिनिटांत सुनावणी घेत खंडपीठ तयार करण्यात येईल असे सांगितले होते.

त्यामुळे या खटल्यासाठी निश्चित करण्यात आलेले ५ सदस्यीय घटनापीठ आता इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने गेल्या वर्षी २७ डिसेंबर रोजी २-१च्या बहुमताने हे प्रकरण ५ सदस्यीय घटनापीठाकडे पाठवण्यास नकार दिला होता. तसेच मशीद इस्लामचा अभिन्न भाग नसल्याचे म्हटले होते.

६ जानेवारीला याबाबतचा खटला सुनावणीसाठी कोर्टात आला तेव्हा हा खटला ५ सदस्यीय घटनापीठाकडेच जाईल याचे कोणतेही संकेत कोर्टाने दिले नव्हते. यात केवळ इतकेच म्हटले होते की, याप्रकरणी स्थापन होणारे घटनापीठ १० जानेवारीला पुढचा आदेश देईन. अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादासंबंधी २.७७ एकर जमीनीच्या प्रकरणी इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या ३० सप्टेंबर २०१०च्या २-१ च्या बहुमताच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात १४ अपील दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर आज सुनावणी होणार आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button