breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिकेचे इराणविषयक दूत भारत, युरोपच्या दौऱ्यावर

अमेरिकेने इराणवर लादलेल्या र्निबधांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे विशेष दूत ब्रायन हुक हे भारत आणि युरोपीय देशांचा दौरा करत आहेत. १० ते १७ ऑक्टोबरदरम्यान ते भारतासह लक्झेंबर्ग, फ्रान्स, बेलिजयमचा दौरा करतील.

इराण अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रे मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी केलेल्या अणुकरारातून माघार घेतली आणि त्या देशावर र्निबध लादले. इतकेच नव्हे तर इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवरही अमेरिका र्निबध लादेल असे जाहीर केले. त्यामुळे भारताचा इराणशी असलेला खनिज तेल व्यापार धोक्यात आला आहे. इराक आणि सोदी अरेबियापाठोपाठ इराण हा भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा तेलपुरवठादार देश आहे. अमेरिकेने इराणकडून तेल आयात बंद करण्यासाठी ४ नोव्हेंबरची अंतिम मुदत दिली आहे.

मात्र भारताने या मुदतीनंतरही इराणकडून तेल विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील दोन सरकारी तेल कंपन्यांनी नोव्हेंबर महिन्यात इराणकडून तेल आयात करण्याची मागणी नोंदवली असल्याचे तेलमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी सांगितले. इराणचे अण्वस्त्रनिर्मितीचे प्रयत्न रोखण्यासाठी त्या देशाकडून तेल घेणे बंद करण्याची गरज आहे, हे ब्रायन हुक अमेरिकेच्या मित्रदेशांना पटवून देण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्याबरोबर ऊर्जा स्रोतविषयक उप-परराष्ट्रमंत्री फ्रान्सिस फॅनॉन हेदेखिल येत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button