अमेरिकन हल्ल्यात किमान 28 इसिस दहशतवादी ठार
मोसूल (सीरिया) – अमेरिकन हल्ल्यात किमान 28 इसिस दहशतवादी ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सोमवारी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त सेनेच्या हल्ल्यात पूर्व सीरियातील किमान 28 इसिस दहशतवादी मारले गेल्याचे रामी अब्दुल रहमान यांनी सांगितले. रामी अब्न्दुल रहमान हे सीरियन ऑब्झरवेटरी फॉर ह्यूमन राइट्सचे प्रमुख आहेत.
अमेरिकन योजनेप्रमाणे पूर्व सीरियातून इसिसला नामशेष करण्यात आलेले आहे. सिरियातील गृहयुद्धही संघर्षाकडून चर्चेत बदलले आहे. लष्करी कारवाई चालूच राहणार असल्याची माहिती सीरियाच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
इराकी सीमेला लागून असलेल्या बीर अल-मेलेह भागात संयुक्त लष्कर, कुर्द आणि अरब योद्धे यांनी हल्ले केले. कधी काळी सीरिया आणि इराकच्या जवळपास संपूर्ण क्षेत्रावर ताब असलेल्या इसिसच आता सीरियाच्या 3 टक्क्यांपेक्षाही कमी क्षेत्रावर ताबा राहिलेला आहे