breaking-newsराष्ट्रिय

अमृतसरमध्ये निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला , 3 ठार 10 जखमी

अमृतसरच्या राजासांसी परिसरातील अादिवाल गावात निरंकारी भवन येथे ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी असल्याची माहिती आहे. येथील निरंकारी भवनामध्ये सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी मंचाच्या दिशेने ग्रेनड फेकला. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. हे दोघेही चेहरा झाकून आले होते. स्फोटानंतर या परिसरात एकच धावपळ उडाली. या हल्ल्यानंतर अमृतसरसह संपूर्ण राज्यात नाकाबंदी करण्यात आली असून नोएडा, दिल्ली, गुरुदासपूर, पठाणकोटसहीत इतर शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दुपारी 12 च्या सुमारास हा ग्रेनेड हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी अमृतसर पोलीस दाखल झाले असून हा दहशतवादी हल्ला होता का याबाबत कसून तपास सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच अमृतसर पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला होता, तसंच ज्या गावात ही घटना घडली ते गाव भारत-पाकिस्तान सीमेवर असल्यामुळे हा दहशतवादी हल्ला होता का याबाबत पोलीस तपास करत आहेत.

या स्फोटात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ANI

@ANI

3 dead & 10 injured in the blast at Nirankari Bhawan in Amritsar’s Rajasansi village: IG (Border) Surinder Pal Singh Parmar

ANI

@ANI

Spot visuals: Several injured in a blast at Nirankari Bhawan in Amritsar’s Rajasansi village. More details awaited. #Punjab

View image on Twitter
View image on Twitter

64 people are talking about this

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button