breaking-newsराष्ट्रिय

अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा

नवी दिल्ली – राज्यसभेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून चर्चा केल्याचे समजते आहे. राज्यसभेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने एनडीएला पाठिंबा द्यावा, अशी विनंती अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

उपसभापतीपदासाठी 123 मतांची गरज आहे. भाजप सभागृहात सर्वात मोठा पक्ष असा असला तरी एनडीएचा आकडा बहुमतापासून दूर आहे. आपले काही मित्रपक्ष आणि काही अपक्ष अशी जोडतोड करुन भाजपचा आकडा 115 पर्यंत पोहोचतो. पण 13 खासदार असलेली एआयडीएएमके कुठल्या बाजूने मतदान करणार हे अजून निश्‍चित नाही.

नाराज अकाली दलाचे तीन खासदार मतदानाच्या वेळी गैरहजर राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भाजप कडून मतांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. दरम्यान, राज्यमंत्रिमंडळात विस्तार आणि फेरबदल होणार असून त्याबाबतही अमित शाह आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनवर चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. त्याचप्रमाणे राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनांवर दोघांमध्ये बोलणे झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button