breaking-newsआंतरराष्टीय

अफगाणिस्तानातील एज्युकेशनल अकादमीवर आत्मघाती हल्ला

48 जण ठार तर 67 जण जखमी 
काबूल – अफगाणिस्तानातील मेवोद एज्युकेशनल अकादमीवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 48 जण ठार झाले आहेत तर 67 जण जखमी झाले. तेथील सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार मृतांमध्ये मुलांचा सर्वाधिक समावेश असून स्फोटामध्ये वर्गखोलीचे छत कोसळल्याने मृतांची संख्या वाढली.

मेवोद एज्युकेशनल अकादमी ही काबुल पीडी-18 च्या दश्‍त-ए-बार्ची भागात आहे. या हल्ल्‌यामागे तालिबानचा हात असल्याचे सांगितले जात असले तरीही तालिबानचा प्रवक्ता जवीउल्लाह मुजाहीद याने हे वृत्त फेटाळले आहे. तालिबानने दहशतवादी हल्ल्याचे वृत्त फेटाळले असले तरीही अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
या अकादमीतील विद्यार्थी विद्यापीठ प्रवेश परिक्षांची तयारी करत होते. आत्मघाती हल्ल्यावेळी अकादमीमध्ये जवळपास 100 मुले होती.

यामध्ये मुले व मुली या दोघांचाही समावेश होता. शहरातील शिया क्‍लर्कियल काऊंन्सिलचे सदस्य जावेद घवरी यांनी इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेवेंट (आयएसआयएल) या संघटनेने हा हल्ला केल्याचा आरोप केला. या संघटनेने मशीदी, शाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर यापूर्वीही हल्ला केला आहे. मागिल दोन वर्षांत शिया समुदायावर 13 हल्ले झालेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button