breaking-newsपुणेमहाराष्ट्र

अपंगत्वाचे खाेटे प्रमाणपत्र देत डाॅ. अजय चंदनवाले ससूनचे अधिष्ठाता, तृप्ती देसाईंचा अाराेप

पुणे: अपंगत्वाचे खाेटे प्रमाणपत्र देत डाॅ. अजय चंदनवाले यांनी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून नेमणूक करुन घेतली असल्याचा अाराेप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला अाहे. पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी ही मागणी केली. चंदनवाले यांनी अपंगत्वाचे खाेटे प्रमाणपत्र बनवून शासनाची फसवणूक केल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली अाहे.

देसाई म्हणाल्या की, डॉ. चंदनवाले कोठेही अपंग असल्याचे दिसत नाहीत, आपल्या पदाचा गैरवापर करत त्यांनी खोटे प्रमाणपत्र बनवून घेतले आणि ससूनच्या अधिष्ठातापदी नेमणूक करून घेतली. तसेच कोणत्याही पदावर 3 वर्षाच्यावर राहत येत नाही मात्र मागील 7 वर्षांपासून ते एकाच पदावर काम करत आहेत. चंदनवाले हे जळगावचे असल्याने आधी भाजप नेते एकनाथ खडसे आणि आता जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा  त्यांना वरदहस्त आहे, त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचं आरोपही देसाई यांनी केला आहे. डॉ. चंदनवाले यांच्याकडे दुचाकी आणि चारचाकीचे लायसन्स आहे, मग अपंग असताना ते गाडी कशी चालवू शकतात असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला.

दरम्यान याबाबत बाेलताना चंदनवाले म्हणाले, यापूर्वीही माझ्यावरती या प्रकराचे अाराेप झाले अाहेत. काेर्टाचा निकाल याबाबत माझ्याबाजूने लागला अाहे. माझी निवड ही लाेकसेवा अायाेगाच्या नियमानुसारच झाली अाहे. त्यामुळे देसाईंच्या अाराेपांमध्ये तथ्य नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button