breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अन्नधान्य वितरण विभागातील भ्रष्ट अधिका-यांच्या विरोधात युवासेना मैदानात

  • पंधरा दिवसांचा दिला अल्टीमेटम
  • अन्यथा युवासेना स्टाईलने आंदोलन करणार

पिंपरी, (महाईन्यूज) – अन्नधान्य वितरण विभागातील प्रशासन आणि स्वस्थ धान्य विक्री दुकानदारांच्या थोतांड कारभारामुळे गोरगरीब कुटुंबातील नागरिकांच्या हक्काचं अन्नधान्य काळ्या बाजारात विकून मलई खाल्ली जात आहे. गोरगरिबांवर होणा-या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील युवासेना मैदानात उतरली आहे. येत्या पंधरा दिवसांत भ्रष्ट अधिकारी व दुकानदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अन्यथा युवासेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा युवासैनिकांनी दिला आहे. त्यामुळे अन्नधान्य वितरण विभागातील प्रशासकीय अधिका-यांचे धाबे दणाणले आहेत.

  • यासंदर्भात युवासेनेच्या वतीने अन्नधान्य वितरण परीमंडल अधिकारी अ/ज यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील रेशन दुकानदार व भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमताने अन्नधान्याचा काळाबाजार होत आहे. गरीब व गरजू नागरीकांना स्वस्त धान्य न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याच्या विरोधात बोलणा-या नागरिकांना धमक्या दिल्या जात आहे.

असला गैरप्रकार थांबविण्यासाठी POS मशिनद्वारे पावती देणे बंधनकारक करण्यात यावे. अशी मागणी युवासेनेने केली आहे. तांत्रीक बदल करण्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी दिला आहे. पंधरा दिवसात जर गोरगरीबांना त्यांच्या हक्काचे अन्नधान्य मिळाले नाही. तसेच, भ्रष्ट अधिकारी व दुकानदार यांच्यावर कारवाई नाही झाली, तर युवासेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा प्रतिक्षा घुले आणि निलेश हाके यांनी दिला आहे.

  • निवेदन देताना जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे, रुपेश कदम, युवती सेनाधिकारी प्रतिक्षा घुले, विभागप्रमुख राजेश वाबळे, विभागसंघटक निलेश हाके, दक्षता समिती सदस्य वैभवी घोडके, विभाग संघटिका कामिनी मिश्रा, राहुल पलांडे, विनय खमगल, सनी कड, अजय पिल्ले उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button