breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

अनधिकृत नळजोडणीवर आयुक्ताचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ ; ‘नेमकं पाणी कुठं मुरतंय’ शोधण्यास अपयशी

अनधिकृत नळजोडणीवर फाैजदारी कारवाई 

नियमतीकरणास 31 आॅक्टोबर डेडलाईन 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील अघोषित पाणीबाणीवर आयुक्त श्रावण हर्डिकर अवैध नळजोडणी, पाणी गळती व चोरी, बांधकामांना पाण्याचा वापर करणा-यावर थापर फोडले आहे. शहरात तब्बल 38 टक्के पाणी वाया जात असल्याने आठ दिवस अवैध नळजोडणीवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ करणार आहेत. येत्या आठ दिवसात ( 31 आॅक्टोबरपर्यंत) अनधिकृत नळजोडणी धारकांनी नियमतीकरण न केल्यास त्यांच्यावर फाैजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिलाय, याकरिता कनिष्ठ, उपअभियंता, कार्यकारी अभियंत्याची देखील सुट्ट्या रद्द करुन ‘नेमकं पाणी कुठं मुरतंय’ याची शोध मोहीम घेतली आहे.  

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महासभेत सत्ताधा-यांसह विरोधी नगरसेवकांनी पाणी टंचाईवरुन आयुक्तांवर हल्लाबोल केला. तब्बल सहा तासाच्या प्रर्दीघ चर्चेनंतर सभा आयुक्तांचा खुलासा न करताच तहकूब करण्यात आली. 31 आॅक्टोबर महासभेत सर्व नगरसेवकांसमोर खुलासा सादर करण्याची मुदत देण्यात आलीय. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांसह आयुक्तांनी कातडी बजावत्मक भूमिका घेतली आहे.

पत्रकार परिषदेत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर म्हणाले की, पवना धरणात परिसरात परतीचा पाऊस यंदा झाला नाही. त्यामुळे धरणातून लवकर नदी पात्रात पाणी सोडावे लागत आहे. त्या उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करुन पुढील जूनपर्यंत पुरवठा करावा लागणार आहे. सध्यस्थितीत एमआयडीसीच्या अडचणी, विद्युत पुरवठा खंडीत, देखभाल दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद यासह अन्य कारणांनी पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.

शहरात तब्बल 1 लाख 29 हजार 55 नळजोडणी आहेत. सध्यस्थितीत शहरात दररोज 38 टक्के पाणी गळती होत आहे. अनेकांनी दोन-तीन अनधिकृत नळ कनेक्शन घेतलेले आहेत. त्याद्वारे कित्येक भागात गढूळ व अशुध्द पाणी पुरवठा होत आहे.  फेब्रूवारी 2018 मध्ये पाणी धोरण मंजूर केले त्यानुसार शहरातील अनधिकृत नळ जोडणीधारकांना सर्व्हे सुरु आहे. त्यानुसार आतापर्यंत 15 हजार 40 धारकांनी नियमतीकरणास अर्ज सादर केलेला आहे. अजूनही काही नळजोडणीधारकांची शोध मोहीम आठ दिवसात पुर्ण करणार आहे. त्या सर्वांना 31 आॅक्टोबरपर्यंत मुदत देवून नियमतीकरणाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ती नळ कनेक्शन अधिकृत करणार आहे. रेडझोन भागातील नळ जोडणीधारकांना नियमतीकरण केल्यास त्याना मीटर बसवण्यात येतील.

पर्यावरण पुरक सोसायटी आणि एसटीपी प्रकल्प असणा-या सोसायटींचा सर्व्हे करणार आहे, त्या सोसायटीतील बंद एसटीपी तत्काळ सुरु करावे लागणार आहे, त्यानुसार पाण्याचा पुर्नवापर करणे आवश्यक आहे. शहरात कुठे बांधकाम व्यावसायिक पिण्याचा पाण्याचा वापर केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, यापुढे अधिका-यांना त्यांची जबाबदारी निश्चित करुन देण्यात येईल, त्यानूसार काम करावे लागेल, त्यानंतरही त्यांनी कृत्रिम पाणी टंचाई केल्याचे निर्देशन आल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल.

भविष्यात शहराला पाण्याची गरज आणखी वाढणार आहे, शहरात अमृत योजनेसह जेएनएनयूआरएम योजनेतंर्गत 24 बाय 7 पाणी पुरवठ्याचे काम सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील 40 टक्क्यापैकी 28 टक्के काम पुर्ण झालेले आहे. संबंधित ठेकेदारांचे काम समाधानकारक नसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल तसेच पवना बंदिस्त जलवाहिनी, आंद्रा, भामा-आसखेड प्रकल्पांचे काम लवकरच मार्गी लावावे लागणार आहे. गरज भासल्यास पाणी पुरवठा नियोजनबाबत गरज भासल्यास पाणी कपातीचा अथवा दिवसाआड निर्णय घेणे आवश्कयक आहे. याविषयीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवलेला आहे.

यावेळी सहशह अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे, विशाल कांबळे, सहाय्यक आयुक्त आण्णा बोदडे उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button